मंदिर-मशीद विवाद स्वातंत्र्यापूर्वी व नंतर… | पुढारी

मंदिर-मशीद विवाद स्वातंत्र्यापूर्वी व नंतर...

 वाराणसी; पुढारी वृत्तसेवा :  वाराणसीतील हा मंदिर- मशीद वाद अनेकदा झालेला आहे. स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांच्या काळात हिंदूंनी पहिल्यांदा 1809 मध्ये विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशिदीच्या मध्यभागी बांधकामाचा प्रयत्न केला, तेव्हा भीषण दंगली उसळल्या होत्या.

  • 1991 : काशी विश्वनाथ मंदिराच्या पुरोहितांच्या वंशजांनी वाराणसी दिवाणी न्यायालयात एक याचिका दाखल केली. मूळ मंदिर 2050 वर्षांपूर्वी राजा विक्रमादित्याने बनविले होते. 1669 मध्ये औरंगजेबाने ते तोडून मशीद बनविली, असा दावा यात करण्यात आला. प्रार्थनास्थळ कायदा 1991 ज्ञानवापी प्रकरणात लागू होत नाही. कारण, मंदिराच्या अवशेषांवरच ती उभी आहे, असा युक्तिवाद करण्यात आला.
  • 1998 : ज्ञानवापी मशिदीची देखरेख करणार्‍या अंजुमन इंतजामिया कमिटीने या याचिकेविरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात
    धाव घेतली. या वादात कुठलाही निर्णय घेतला जाऊ शकत नाही. कारण, प्रार्थनास्थळ कायदा 1991 च्या ते विरोधात आहे. यानंतर उच्च न्यायालयाने दिवाणी न्यायालयातील सुनावणी रद्द केली होती.
  • 2019 : विजय शंकर रस्तोगी यांनी वाराणसी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करून ज्ञानवापी मशीद परिसराचा आर्कियोलॉजिकल सर्व्हे करण्याची मागणी एका याचिकेतून केली. हायकोर्टाच्या स्थगन आदेशाच्या वैधतेबाबत सुप्रीम कोर्टाच्या एका आदेशानंतर 2019 मध्ये वाराणसी न्यायालयात पुन्हा सुनावणी सुरू झाली.
  •  2020 :  अंजुमन इंतजामिया या ज्ञानवापी मशीद व्यवस्थापन समितीने आर्कियोलॉजिकल सर्व्हेबाबतच्या याचिकेला विरोध
    केला. सुनावणी रद्द करण्याची मागणी केली. पुढे रस्तोगी यांनी स्थगन आदेशाबाबतच्या न्यायालयीन आदेशाचा दाखला दिला.
  •  2022 : खटला सुनावणीस योग्य असल्याचा निकाल वाराणसी जिल्हा न्यायालयाने दिला.

 

Back to top button