

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : नागरिकत्व सुधारणा कायद्याला (सीएए) विरोध करणार्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय येत्या 12 सप्टेंबर रोजी सुनावणी घेणार आहे.
केंद्र सरकारने 2019 मध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा संसदेत मंजूर केला होता. त्यानंतर देशभरात मोठ्या दंगली उसळल्या होत्या. हा कायदा मागे घेतला जाणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले होते. नागरिकत्व कायद्याला विरोध करीत सर्वोच्च न्यायालयात दोनशेपेक्षा जास्त याचिका दाखल झाल्या आहेत. सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ सर्व खटल्यांची १२ सप्टेंबरपासून सुनावणी सुरु होणार आहे.
हेही वाचा :