याकुब मेमन कबरीचा वाद : याकुब मेमनच्या कबरीच्या सुशोभीकरणासाठी मदत करणा-यांवर कारवाई करा – बावनकुळे | पुढारी

याकुब मेमन कबरीचा वाद : याकुब मेमनच्या कबरीच्या सुशोभीकरणासाठी मदत करणा-यांवर कारवाई करा - बावनकुळे

पुढारी ऑनलाइन डेस्क : मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोट मालिकेतील दोषी दहशतवादी याकुब मेमनच्या कबरीच्या सुशोभिकरणासाठी भाजपकडून मविआ सरकारचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. तर भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सुशोभीकरणाला मदत करणा-यांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी केली आहे.

मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोट मालिकेतील मुख्य सूत्रधार दहशतवादी याकुब मेमन याच्या कबरीवरून वाद सुरू झाला आहे. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात याकूब मेमन याला दोषी धरून विशेष टाडा न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा ठोठावली होती. 30 जुलाई 2015 ला सकाळी 6.30 वाजता त्याला फाशी देण्यात आली होती. नंतर याकुबचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांना सोपवण्यात आला होता.
मरीन लाइन्स येथील बडा कबरस्तान येथे त्याचा त्याच्या कुटुंबियांकडून अंत्यविधी करून दफन करण्यात आले होते. आता त्याच्या या कबरीवरून मोठा वाद सुरू झाला आहे. सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण करण्यात आले असून कबरी भोवती मार्बलने सजवून त्याला लायटिंग करण्यात आली आहे. तसेच फुलांचा वर्षाव करण्यात आला आहे, असे फोटोत दिसत आहे.

हा फोटो व्हायरल झाल्यानंतर राजकीय वादाला तोंड फुटले आहे. काँग्रेस भाजपच्या आमदारांनी एकमेकांवर टीका करणे सुरू केले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि आमदार राम कदम यांनी यावरून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या काळात याकुबच्या कबरीवर मझारमध्ये रुपांतर झाले. हेच आहे का त्यांचे मुंबईवरील प्रेम आणि देशभक्ती असा सवाल करत त्यांनी शरद पवार, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या जनतेची माफी मागावी असे ट्विट राम कदम यांनी केले आहे.

तर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर मोठी टिका केली आहे. उद्धव ठाकरेंनी या घटनेबाबत स्पष्टीकरण द्यावे असे म्हटले आहे. हे मविआ सरकराच्या काळातील पाप आहे. त्याला आताचे सरकार जबाबदार नाही. उद्धव ठाकरे यांनी सरकार टिकवण्यासाठी किती तडजोडी केल्या? असा सवाल ही त्यांना केला आहे. तसेच मविआ सरकारच्या कारभाराचा तीव्र निषेध केला आहे.

याप्रकरणी कबरस्तानचा कर्मचारी अशफाक याने एका वृत्तवाहिनीला दिलेली अधिक माहिती अशी की, याकूबच्या कबरेसाठी जागा खूप आधीपासून घेण्यात आली होती. त्याच्या कबरी शेजारी आणखी तीन कबरी आहे. ज्या त्याच्या नातेवाइकांच्या आहे. कबरस्तानात फक्त याकूबचीच कबर नव्हे तर अशा अनेक कबरी आहेत ज्यांना मार्बलने सजवले आहे. यासाठी त्यांच्याकडून वार्षिक फी आकारण्यात येते. याकूब चे नातेवाईक नियमितपणे कबरीची साफ-सफाई करतात. शब बे बारातच्या दिवशी संपूर्ण कबरस्तान सजवून रोषणाई केली जाते. अशफाक याच्या मते व्हायरल फोटो हा त्याच रात्रीचा आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होताच. पोलिस प्रशासनाने कबरस्तानात जाऊन पाहणी केली. तसेच 18 मार्चला तिथे लावलेल्या एलईडी लाईट्स काढण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा :

भाजपला बारामतीत अश्वमेध रोखल्यासारखा त्रास होतोय; जयंत पाटील यांचा टोला

महापालिका निवडणुका भाजप-शिंदे गट एकत्र लढविणार; फडणवीस यांची घोषणा

Back to top button