सायरस मिस्त्रींच्‍या निधनानंतर आनंद महिंद्रा यांनी केला एक संकल्‍प : म्‍हणाले, हे सर्वांसाठी आवश्‍यक | पुढारी

सायरस मिस्त्रींच्‍या निधनानंतर आनंद महिंद्रा यांनी केला एक संकल्‍प : म्‍हणाले, हे सर्वांसाठी आवश्‍यक

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचे ४ सप्‍टेंबर राेजी  लघरजवळील अपघातात निधन झाले. या दुर्घटनेमुळे देशातील उद्‍योग जगताला हादरा बसला आहे. ख्‍यातनाम उद्‍योजक आनंद महिंद्रा यांनीही सायरस यांच्‍या आकस्‍मिक निधनावर तीव्र शोक व्‍यक्‍त केला आहे. तसेच त्‍यांनी एक संकल्‍पही केला असून यांची माहिती त्‍यांनी ट्वीटच्‍या माध्‍यमातून दिली आहे.

ट्वीट करत म्‍हणाले, ‘मी संकल्‍प करतो की…’

Anand Mahindra सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असतात. त्‍याचे प्रेरणादायी ट्वीटस आणि व्‍हिडिओला खूप पसंतीही मिळते. सायरस यांच्‍या अपघाती मृत्‍यूनंतर त्‍यांनी आपल्‍या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन ट्वीट केले आहे की, ” मी संकल्‍प करतो की, कारच्‍या मागील सीटवर बसल्‍यावर मी नेहमी सीट बेल्‍ट घालून बसेन. त्‍यांनी हा संकल्‍प केला आहेच त्‍याचबरोबर त्‍यांनी म्‍हटले आहे की, “अशी प्रतिज्ञा सर्वांनीच घ्‍यावी, असे आवाहनही मी करतो. सर्वांनी आपल्‍या कुटुंबीयांची काळजी घेणे गरजेचे आहे. त्‍यामुळेच मी आग्रह करतो की मी जो संकल्‍प केला आहे तो तुम्‍हीही करा. कारच्‍या मागील सीटवर बसला की सीटबेल्‍ट घाला.”

सायरस मिस्त्री यांनी घातला नव्‍हता सीट बेल्‍ट

अपघातावेळी सायरस मिस्त्री हे कारच्‍या मागील सीटवर बसले होते. त्‍यांनी सीट बेल्‍ट घातला नव्‍हते. कारमध्‍ये चार जण होते. डॉक्‍टर अनाहित पंडोले कार चावलत होत्‍या. त्‍यांच्‍या शेजारी त्‍यांचे पतीन डेरियस पंडोले बसेल होते. या दोघांनीही सीट बेल्‍ट घातल होता. त्‍यामुळे त्‍यांचे प्राण वाचले होते.

काही दिवसांपूर्वी आनंद महिंद्रांनी केले होते एक सूचक ट्वीट

गणेश चतुर्थीनिमित्त सर्वांना शुभेच्‍छा देताना आनंद महिंद्रा यांनी एक व्‍हिडिओ ट्वीट करत सर्वांनी कारमध्‍ये बसल्‍यानंतर सीट बेल्‍ट घालावा, असे आवाहन केले होते. या व्‍हिडिओमध्‍ये गणपतीच्‍या मूर्तीला सीटबेल्‍ट घातल्‍याचे दाखविण्‍यात आले होते. जर देव सर्व नियमांचे पालन करतात तर माणसांनी ते का करु नयेत, असा सवालही आनंद महिंद्र यांनी केला होता.

 

 

 

 

Back to top button