

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : काॅंग्रेस पक्षाची भारत जोडो यात्रा म्हणजे 'गांधी कुटुंब बचाओ' आंदोलन असल्याची टीका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबीत पात्रा यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. नॅशनल हेरॉल्ड घोटाळ्याच्या अनुषंगाने पात्रा यांनी कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर निशाना साधला.
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात सोनिया आणि राहुल गांधी हे जामिनावर बाहेर आहेत. अलिकडेच या दोघांची तपास संस्थांनी चौकशी केली होती. या दोघांना ज्यावेळी तपास संस्थांनी बोलाविले होते, तेव्हा कॉंग्रेसने विघटनकारक भूमिका घेतली होती. तपास संस्थांवर दबाव आणण्याचा प्रयत्नसुध्दा केला होता. कॉंग्रेसने नुकताच भारत जोडो यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची ही यात्रा म्हणजे गांधी कुटुंब बचावाचे आंदोलन आहे. सोनिया आणि राहुल यांना भ्रष्टाचाराचा आधीपासून वारसा मिळालेला आहे. उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे नेते चंद्रभानू गुप्ता यांनी आपले आत्मचरित्र लिहिलेले आहे. त्यात कॉंग्रेसला होणाऱ्या अर्थपुरवठ्याबाबत त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत, असेही पात्रा यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा :