Karnataka : ‘शिवमूर्ती मुरुघा’ आयसीयूत दाखल, अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी | पुढारी

Karnataka : 'शिवमूर्ती मुरुघा' आयसीयूत दाखल, अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

पुढारी ऑनलाइन डेस्क : अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळालेल्या श्री मुरुघा मठाचे मुख्य पूजारी शिवमूर्ती मुरुघा यांना चित्रदुर्गाच्या जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डमध्ये नेले जात आहे. छातीत दुखू लागल्याने त्यांना येथे आणण्यात आले, अशी माहिती अधिका-यांनी दिली.

बेळगाव : दारू प्याले अन् बारमालकाला दिल्या लहान मुलांच्या खेळण्यातील नोटा, तिघांना अटक

दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी कर्नाटक पोलिसांनी गुरुवारी श्री मुरुघा मठाचे मुख्य पुजारी शिवमूर्ती मुरुघा शरनारू यांना अटक करण्यात आली. गुरुवारी रात्री उशिरा अटक केल्यानंतर त्यांना चित्रदुर्गातील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. त्यानंतर त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. कर्नाटकचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADGP) आलोक कुमार यांनी सांगितले की, अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या श्री मुरुघा मठाचा मुख्य पुजारी शिवमूर्ती मुरुघा शरनारू याला अटक करण्यात आली आहे.

एडीजीपी म्हणाले की, नियमानुसार कायद्यांचे पालन केले जाईल. प्रक्रियेनुसार वैद्यकीय चाचणी आणि तपासणी केली जाईल. त्यालाही न्यायाधीशांसमोर हजर करण्यात येणार असल्याचे कुमार यांनी सांगितले. मंगळवारी चित्रदुर्ग येथील जिल्हा सत्र न्यायालयाने मुरुघा मठाच्या मुख्य पुजाऱ्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर १ सप्टेंबरपर्यंत स्थगिती दिली.

वृत्तसंस्था एएनआयच्या म्हणण्यानुसार, अल्पवयीन मुलींनी लैंगिक छळ केल्याचा आरोप केल्यानंतर चित्रदुर्गातील प्रभावशाली मुरुगा मठाच्या पुजारीविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला होता. चित्रदुर्गातील मुरुघा मठातील शिवमूर्ती मुरुघा शरनारू यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआरनुसार या मुलींचे दोन वर्षांहून अधिक काळ लैंगिक शोषण करण्यात आले.

हे ही वाचा :

बेळगाव : तीस अभियांत्रिकी महाविद्यालये बनणार ‘सुपर’

बेळगाव : कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या कारला अपघात (Video)

 

Back to top button