Noida Twin tower : नोएडा येथील ट्विन टॉवरच्या जागी होणार श्रीराम आणि महादेवाचे भव्य मंदिर | पुढारी

Noida Twin tower : नोएडा येथील ट्विन टॉवरच्या जागी होणार श्रीराम आणि महादेवाचे भव्य मंदिर

पुढारी ऑनलाईन डेस्क : नोएडा येथील बेकायदेशीर ट्विन टॉवर (Noida Twin tower) या जुळ्या इमारती पाडल्यानंतर या जागी काय होणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. आता या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. या जागेवर श्रीराम मंदिर आणि महादेवाचे मंदिर बांधण्यात येणार आहे. तसेच एक मोठे उद्यान आणि मुलांना खेळण्यासाठी मैदान तयार केले जाणार आहे, अशी माहिती रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशनचे (RWA) अध्यक्ष उदयभानसिंह तेवतिया यांनी दिली आहे.

तेवतिया म्हणाले की, काही दिवसांपूर्वी रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक झाली. या बैठकीत जुळ्या इमारतीच्या जागी भव्य मंदिर बांधण्याच्या निर्णयावर सर्वांनी सहमती दर्शवली. या मंदिरात भगवान श्रीराम आणि भोलेनाथच्या मूर्तीसह देवदेवतांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मुलांसाठी खेळण्यासाठी मैदान तयार करण्यात येणार आहे. तसेच एक पार्कही बनविण्यात येणार आहे. हे सर्व सोसायटीच्या रहिवासांच्या सहकार्यातून केले जाणार आहे.

Noida Twin tower : एक तृतीयांश संमती अनिवार्य आहे

सुपरटेक एमराल्ड कोर्टचे हस्तांतरण अद्याप झालेले नाही. सध्या मालकी बिल्डरकडे आहे. जर येथे बिल्डरला कोणताही प्रकल्प उभा करायचा असेल, तर त्यास सोसायटीच्या दोन तृतीयांश लोकांची सहमती आवश्यक आहे. तसे झाले नाहीतर सोसायटी कायदेशीर लढाई लढण्यास तयार आहे. परंतु येथे मंदिर बनविण्याच्या प्रस्तावाला सर्वांची सहमती आहे.

ट्विन टॉवर हा सुपरटेक कंपनीची निर्मिती

दिल्ली एनसीआरच्या नोएडा भागातील ट्विन टॉवर हा सुपरटेक कंपनीची निर्मिती होती. या कंपनीच्‍या मालकांचे नाव आहे आर के अरोरा. बांधकाम, आर्थिक सल्‍लगार, शेअर विक्री आणि खरेदी, प्रिंटिग, चित्रपट निर्मिती, गृह कर्ज अशा विविध ३४ कंपन्‍यांची त्‍यांनी आजवर उभारणी केली.

मीडिया रिपोर्ट्‍सनुसार, आर. के. अरोरा यांनी आपल्‍या काही सहकार्‍यांसमवेत ७ डिसेंबर १९९५ रोजी आपल्‍या सुपरटेक कंपनीची सुरुवात केली. नोएडा, ग्रेटर नोएडा, यमुना विकास प्राधिकरण क्षेत्र, मेरठ, दिल्‍ली-एनसीआरसह देशातील १२ शहरामंध्‍ये त्‍यांनी बांधकाम क्षेत्रात आपले प्रकल्‍प सुरु केले. काही वर्षांमध्‍ये बांधकाम क्षेत्रातील अग्रणी अशी त्‍यांच्‍या कंपनीची ओळख झाली. यानंतर त्‍यांनी विविध क्षेत्रात ३४ कंपन्‍या सुरू केल्या.

सुपरटेक लिमिटेड कंपनी सुरुवात झाल्‍यानंतर चार वर्षांनी म्‍हणजे १९९९ मध्‍ये अरोरा यांनी पत्‍नी संगीता अरोरा यांनी सुपरटेक बिल्‍डर्स आणि एंड प्रमोटर्स प्रायव्‍हेट लिमिटेड कंपनी सुरु केली होती. तसचे आपला पुत्र मोहित अरोरा यांच्‍यासह उर्जा निर्मिती, वितरणामध्‍ये त्‍यांनी काम सुरु केले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button