jio 5g : जीओची 5G सेवा दिवाळीपर्यंत सुरू होणार! मुकेश अंबानींची ‘रिलायन्स’च्या सभेत मोठी घोषणा

jio 5g : जीओची 5G सेवा दिवाळीपर्यंत सुरू होणार! मुकेश अंबानींची ‘रिलायन्स’च्या सभेत मोठी घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : jio 5g : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 45 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला (एजीएम) संबोधित करताना कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी 5 जी संदर्भात मोठी घोषणा केले. दिवाळीपर्यंत जिओ (Jio) देशात 5G सेवा सुरू करेल त्यांनी जाहीर केले. ही सेवा सुरुवातीला दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या चार मेट्रो शहरांमध्ये लॉन्च केले जाईल. फक्त जिओकडे 700 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम असून Jio 5G चे कव्हरेज उत्तम तसेच सर्वात परवडणारे असेल. यासाठी जीओ 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचीही त्यांनी माहिती दिली.

देशात 5G सेवा कधी सुरू होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोमवारी (दि. 29) रिलायन्स जिओकडून 5G बाबत मोठी घोषणा करण्यात आली. मुकेश अंबानी यांनी Jio ची 5G सेवा देशात कधी सुरू होईल याबाबत मोठा खुलासा केला. दिवाळीच्या मुहूर्तावर चार महानगरांतून ही सेवा सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच Jio 5G सेवा ही जगातील सर्वात प्रगत 5G असेल असा दावासुद्धा मुकेश अंबानी यांनी सर्वसाधारण बैठकीत केला.

दिवाळीत कोणत्या शहरांमध्ये 5G सेवा सुरू होईल?

या दिवाळीत दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे 5G सेवा सुरू होणार आहे. टेलिकॉम कंपनी रिलायन्सच्या वार्षिक बैठकीत मुकेश अंबानी यांनी याबाबतची घोषणा केली.

इतर शहरांमध्ये 5G कधी सुरू होणार?

या वर्षी दिवाळीपर्यंत मोठ्या शहरांमध्ये 5G सेवा सुरू होईल, तर डिसेंबर 2023 पर्यंत संपूर्ण देशातील सर्व शहरे, जिल्हे, तालुके, ग्रामिण भागात जिओची 5 जी सेवा सुरू होईल, असेही जाहीर करण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news