

मथुरा, वृत्तसंस्था : धावत्या कोईम्बतूर एक्स्प्रेसमध्ये के. केशवन (वय 63) या प्रवाशाला हार्टअॅटॅक आला. केशवन यांच्या पत्नी दया धाय मोकलून रडू लागल्या… आणि…
मथुरा स्थानक आले तसे केशवन यांची प्रकृती अधिकच बिघडली. प्लॅटफॉर्मवर त्यांना उतरविण्यात आले. हे द़ृश्य पाहून आरपीएफ जवान अशोक कुमार धावतच आले. रडू नका, त्यांच्या (केशवन यांच्या) तोंडात तुम्ही हवा फुंका, असे दया यांना अशोक कुमार यांनी सांगितले. दया यांनी तसेच केले. अशोक कुमार यांनीही केशवन यांच्या छातीवर हातांनी पम्पिंग केले. 33 सेकंदांच्या या 'सीपीआर'ने केशवन यांना शुद्ध आली.
तोवर अॅम्ब्युलन्सही दाखल झाली होती. मथुरेतील एका खासगी रुग्णालयात केशवन यांना दाखल करण्यात आले. हे दाम्पत्य चार धाम यात्रेवर होते. केशवन यांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे.