Maldivian Minister Ali Solih : मालदीवचे मंत्री अली सोलिह यांच्यावर हल्ला; चाकूने वार करण्याआधी धार्मिक मंत्राची उच्चारणा

Maldivian Minister Ali Solih : मालदीवचे मंत्री अली सोलिह यांच्यावर हल्ला; चाकूने वार करण्याआधी धार्मिक मंत्राची उच्चारणा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मालदीवचे एमडीपीचे मंत्री अली सोलिह (Maldivian Minister Ali Solih) यांच्यावर सोमवारी दुपारी एका व्यक्तीने चाकूने वार केल्याची हिंसक घटना घडली. मालदीवची राजधानी मालेच्या उत्तरेकडील हुलहुमाले येथे हा हल्ला करण्यात आला.

या हल्ल्यात सोलिह यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली आहे. या हिंसक घटनेनंतर हल्लेखोराला अटक करण्यात आली. सोलिह हे पर्यावरण, हवामान बदल आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री आहेत. ते जुम्हूरी पार्टीचे (जेपी) प्रवक्ते आहेत. याच जुम्हूरी पक्षाची मालदीवियन डेमोक्रॅटिक पक्षासोबत (MDP) युती आहे ज्याचे इब्राहीम सोलीह अध्यक्ष आहेत.

टाईम्स ऑफ अड्डूच्या वृत्तानुसार, सोलिह हुलहुमाले येथील रस्त्यावर मोटरसायकलवरून जात असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. मालदीवच्या प्रसारमाध्यमांनी सांगितले की, सोलिह यांच्या हल्ला करण्यापूर्वी आरोपीने कुराणातील काही श्लोकांचे पठण केले. त्यांच्या मानेवर चाकूने वार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र हल्लेखोराचा हा प्रयत्न फसल्याने डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली

सोलिह हल्लेखोरापासून जीव वाचवण्यासाठी मोटरसायकलवरून उतरून त्यांच्या तावडीतून निसटले. त्यांच्यावर हुलहुमाले रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मालदीव, हिंद महासागरातील द्वीपसमूह आहे. मे २०२१ मध्ये माजी अध्यक्ष मोहम्मद नशीद यांच्यावर राजधानी माले येथील त्यांच्या घराबाहेरील बॉम्बस्फोटानंतर ते चर्चेत होते. नशीद यांच्या कारजवळ उभ्या असलेल्या दुचाकीमध्ये स्फोटक यंत्र बसवण्यात आले होते. या हल्ल्यात नशीद यांना उपचारांसाठी एअरलिफ्ट मधून जर्मनीला नेण्यात आले.

मालदीवला वाढत्या इस्लामिक कट्टरतावादाचा तसेच जागतिक दहशतवादी संघटनांसाठी होत असणाऱ्या भरतीचा धोका आहे. अध्यक्ष नशीद यांच्यासह अध्यक्ष सोलिह यांच्या नेतृत्वाखालील सध्याचे सरकार, प्रशासन आणि सामाजिक नियमांबद्दलच्या दृष्टिकोनात लोकशाही आणि उदारमतवादी म्हणून ओळखले जाते. MDP आंतरराष्ट्रीय समर्थनासह हिंद महासागरातील देशामध्ये कट्टरपंथी प्रवृत्तींच्या वाढीविरूद्ध दीर्घकाळ लढा देत आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news