New Mobile Recharge Rules | मोबाईल ग्राहकांसाठी गुड न्यूज! २१ ऑक्टोबरपासून रिचार्जच्या नियमांत मोठा बदल

दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्‍या नव्‍या नियमामुळे ग्राहकांना दिलासा
New Mobile Recharge Rules |
New Mobile Recharge Rules | मोबाईल ग्राहकांसाठी गुड न्यूज! २१ ऑक्टोबरपासून रिचार्जच्या नियमांत मोठा बदल
Published on: 
Updated on: 

नवी दिल्‍ली; वृत्तसंस्‍था : देशभरातील लाखो मोबाईल प्रीपेड ग्राहकांसाठी आनंददायी व मोठा दिलासा देणारी बातमी आहे. केंद्र सरकार आणि ट्राय (TRAI) ने टेलिकॉम नियमांत बदल करत २८ ऐवजी ३० दिवसांच्या वैधतेचे (व्हॅलिडिटी) नवीन रिचार्ज प्लॅन लागू केले आहेत. यामुळे ग्राहकांना आता वर्षभरात १३ ऐवजी फक्त १२ रिचार्ज करावे लागतील. हा बदल २१ ऑक्‍टोबरपासून अंमलात येणार आहे. भाजप खासदार राघव चढ्ढा यांनी ‘एक्स’ पोस्टच्‍या माध्‍यमातून ही माहिती देत सरकार आणि ट्रायचे आभार मानले आहेत.

नव्‍या नियमामुळे प्रीपेड मोबाईल ग्राहकांना प्रत्‍येक २८ दिवसांनी फोन रिचार्ज करण्याच्या त्रासातून मुक्ती मिळणार आहे. केंद्र सरकारने ‘टेलिकॉम कन्झ्युमर प्रोटेक्शन (१३ वी दुरुस्ती) रेग्युलेशन, २०२६’ लागू केले आहे. या नवीन नियमांनुसार टेलिकॉम कंपन्यांना आता संपूर्ण ३० दिवसांच्या वैधतेचे प्लॅन सादर करावे लागतील.

व्हॉईस व एसएमएस ओन्‍ली प्‍लॅनची सुविधा

मोबाईलचा वापर प्रामुख्‍याने कॉलसाठी करणार्‍या आणि इंटरनेट डेटाची गरज नसलेल्‍या ग्राहकांना आता व्‍हॉईस व एसएमएस ओन्‍ली प्‍लॅनची सुविधा उपलब्‍ध होईल. तर कमी बजेटमध्‍ये मोबाईल वापरणार्‍या आणि व्‍हॉईस कॉलिंगची गरज असलेल्‍या ग्राहकांना स्‍वतंत्र रिचार्जचा पर्याय मिळणार आहे.

ग्राहकांची होणार सोय

* ३० दिवस किंवा त्‍यापेक्षा कमी वैधतेचे व्‍हॉईस एसएमएस प्‍लॅन उपलब्‍ध करावे लागणार.

* प्रत्‍येक महिन्‍याच्‍या त्याच तारखेला रिन्‍यू होणारे रिचार्ज उपलब्‍ध होणार.

* केवळ कॉल व एसएमएसची गरज असलेल्‍या ग्राहकांसाठी स्‍वतंत्र प्‍लॅनची उपलब्‍धता.

* कमी कालावधीच्‍या डेटा बंडल प्‍लॅनसोबत व्‍हॉईस एसएमएस ओन्‍ली रिचार्जही द्यावे लागणार.

* डेटाची सुविधा नसल्‍याने या रिचार्जचे दर त्‍यानुसार योग्‍य प्रमाणात ठेवावे लागणार.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news