.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरातमधील पोरबंदर येथे बचावकार्य करण्यासाठी गेलेल्या ALH हेलिकॉप्टर ध्रुवचे अरबी समुद्रात सोमवारी रात्री ११ वाजता इमर्जन्सी हार्ड लँडिंग करावे लागले. या दरम्यान झालेल्या अपघातात हेलिकॉप्टरमधील भारतीय तटरक्षक दलाचे २ वैमानिक आणि एक क्रू मेंबर बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी युद्धपातळीवर शोधमोहिम राबवण्यात येत असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, एका क्रू मेंबरला वाचवण्यात यश आले आहे, मात्र उर्वरित तीन जण बेपत्ता आहेत. हे हेलिकॉप्टर गुजरातमधील पुराशी संबंधित मदत आणि बचाव कार्यात गुंतले होते. या संपूर्ण प्रकरणाची माहिती असलेल्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, सोमवारी (दि.२ सप्टें) रात्री हेलिकॉप्टरने पोरबंदरजवळील समुद्रात आपत्कालीन लँडिंग केले.
पोरबंदरपासून सुमारे 45 किलोमीटर अंतरावर मोटार टँकर हरी लीला या जहाजाच्या मास्टरकडून मिळालेल्या विनंतीला प्रतिसाद म्हणून ALH हेलिकॉप्टर रवाना झाले होते. मोटार टँकर हरी लीलामधील एक क्रू सदस्य जखमी होता. त्याच्या मदतीसाठी हे हेलिकॉप्टर जात होते. पण या दरम्यान चार क्रू सदस्यांसह या हेलिकॉप्टरला "इमर्जन्सी हार्ड लँडिंग" करावे लागले आणि या ऑपरेशन दरम्यान ते समुद्रात उतरवले गेले, असे आयसीजीने सांगितले. एक क्रू सदस्याची सुखरूप सुटका करण्यात आली असून उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे. हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले आहेत,” असे तटरक्षक दलाने सांगितले. बेपत्ता तिघांच्या शोधासाठी भारतीय तटरक्षक दलाने (ICG) 04 जहाजे आणि 02 विमाने तैनात केली आहेत, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
गुजरातमधील पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आणि मदत सामग्री पोहोचवण्यात हे हेलिकॉप्टर व्यस्त होते. या कारवाईत तटरक्षक दलाने 4 जहाजे आणि दोन विमाने तैनात केली आहेत. गुजरातमधील पूर आणि चक्रीवादळात आतापर्यंत भारतीय तटरक्षक दलाच्या प्रगत लाईट हेलिकॉप्टरने ६७ लोकांचे प्राण वाचवले आहेत. तटरक्षक दलाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोमवारी (दि.२ सप्टें) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास त्याचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. वैद्यकीय बचावासाठी हे हेलिकॉप्टर रवाना करण्यात आले होते.