भर पंचायतीत सुनेने बेदम मारहाण करून सासऱ्यालाच संपवले! | पुढारी

भर पंचायतीत सुनेने बेदम मारहाण करून सासऱ्यालाच संपवले!

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशातील बरेली येथे एका दाम्पत्यामध्ये वाद झाला. यानंतर वाद मिटवण्यासाठी गावात पंचायत बोलावण्यात आली. प्रकरण पंचायतीत इतके विकोपाला गेले की, सुनेने सासऱ्याला काठीने बेदम मारहाण केली. यात सास-याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गावात धाव घेत प्रकरणाचा आढावा घेतला. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे.

बरेलीतील मीरगंज पोलीस ठाण्याच्या पश्चिम गौटिया गावात राहणारा मूलचंद यांचा मुलगा कुंवर सेन याचा पत्नी पुला देवीसोबत काही कारणावरून वाद सुरू होता. हा वाद मिटवण्यासाठी फुला देवी यांनी कुटुंबीयांना बोलावले. यानंतर पंचायत चर्चेसाठी बसली.

पंचायतीमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान हाणामारी

असे सांगितले जात आहे की, विवाहिते तिच्या मामा आणि भावाला तिच्या माहेरून बोलावले. पंचायतीमध्ये चर्चा सुरू असतानाच पती-पत्नेमध्ये वाद झाला त्याचे पर्यवसन हाणामारीत झाले. यात विवाहितेचा सासरा बचावासाठी मधे पडला. पण विवाहितेने सास-याच्या डोक्यात काठीने मारहाण केली. यात गंभीर जखमी झाल्यानंतर सास-याचा मृत्यू झाला. हे पाहून विवाहितेने तिच्या माहेरच्या लोकांसह पळ काढला.

गुन्हा दाखल

या प्रकरणाबाबत एसपी क्राईम मुकेश सिंह यांनी सांगितले की, मीरगंज पोलीस स्टेशन परिसरात एका जोडप्यात वाद झाला होता. महिलेने काका आणि भावाला बोलावून घेतले. यानंतर वादातून हाणामारी सुरू झाली. यादरम्यान विवाहितेने सासरच्या डोक्यात काठीने वार केल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृताची सून फुलादेवी आणि तिचे काका ग्यानी यांना अटक करण्यात आली आहे. कारवाई करण्यात येत असल्याची माहिती दिली.

Back to top button