पापा, आप हर पल मेरे साथ… राहुल गांधी यांनी शेअर केला भावूक व्हिडिओ.. | पुढारी

पापा, आप हर पल मेरे साथ... राहुल गांधी यांनी शेअर केला भावूक व्हिडिओ..

पुढारी ऑनलाईन डेस्क : कॉग्रेस नेते राहुल गांधी यांनी वडील, दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीदिनी (Rajiv Gandhi birth anniversary ) एक भावूक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ ट्विट करत त्यांनी लिहले आहे, पापा, आप हर पल मेरे साथ, मेरे दिल में हैं। मैं हमेशा प्रयास करूंगा कि देश के लिए जो सपना आपने देखा, उसे पूरा कर सकूं.

राजीव गांधी यांची आज ७८ वी जयंती. जयंतीनिमित्त आज (ऑगस्ट २०, २०२२) सकाळी राजीव गांधी यांचे पुत्र, काँग्रेस नेते राहुल गांधी, महासचिव प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी वीर भूमीवर श्रद्धांजली वाहिली. यावेळी प्रियांका-राहुल यांच्यासोबत रॉबर्ट वाड्रा (Robert Vadra), कॉंग्रेसचे सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल (K.C.Venugopal), कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) हेही यावेळी उपस्थित होते.

Rajiv Gandhi birth anniversary : तुम्ही पाहिलेले स्वप्न…

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर  राजीव गांधी यांच्या ७८ व्या जयंतीनिमित्त आज (ऑगस्ट २०, २०२२) सकाळी  आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याला कॅप्शन दिले आहे. “बाबा, तुम्ही प्रत्येक क्षणी माझ्यासोबत आहात, माझ्या हृदयात आहात. देशासाठी तुम्ही पाहिलेले स्वप्न मी पूर्ण करू शकेन, यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. (पापा, आप हर पल मेरे साथ, मेरे दिल में हैं। मैं हमेशा प्रयास करूंगा कि देश के लिए जो सपना आपने देखा, उसे पूरा कर सकूं।) प्रियांका गांधी यांनीही व्हिडिओ शेअर करत वडील राजीव गांधी यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी दिवंगत राजीव गांधी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान

भारताचे माजी पंतप्रधान, दिवंगत राजीव गांधी यांची आज ७८ वी जयंती. त्यांचा जन्म  20 ऑगस्ट 1944 रोजी झाला. राजीव गांधी हे देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान होते. त्यांनी आपल्या वयाच्या 40 व्या वर्षी पंतप्रधान पदाची सुत्रे हाती घेतली. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते. 21 मे 1991 रोजी त्यांची हत्या करण्यात आली.

हेही वाचलंत का?

 

Back to top button