भ्रष्टाचार आणि घराणेशाही हे देशासमोरील सगळ्यात मोठे आव्हान – पंतप्रधान मोदी | पुढारी

भ्रष्टाचार आणि घराणेशाही हे देशासमोरील सगळ्यात मोठे आव्हान - पंतप्रधान मोदी

पुढारी ऑनलाइन डेस्क :देशाच्या समोरील सगळ्यात मोठी आव्हाने भ्रष्टाचार आणि घराणेशाही हे आहेत, असे पंतप्रधान यांनी म्हटले आहे. स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहणानंतर देशवासियांना संबोधन करताना देशाच्या प्रगतीसाठी भ्रष्टाचार आणि घराणेशाही कशा प्रकारे बाधक आहे यावर मोदी यांनी भाष्य केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या सर्व भारतवासीयांना शुभेच्छा, पंतप्रधानांचे देशवासियांना संबोधन (पाहा लाईव्ह)

मोदी म्हणाले, आज देशात प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला आहे. देशात एकीकडे अशी जनता आहे जिच्याकडे राहण्यासाठी जागा नाही तर दुसरीकडे भ्रष्टाचा-यांना चौरीचे पैसे लपवण्यासाठी जागा पूरत नाही. ही स्थिती अजिबात चांगली नाही. ही परिस्थिती बदलायला हवी, असे ते म्हणाले.

जय जवान, जय किसान, जय विज्ञाननंतर आता जय अनुसंधान – पंतप्रधान मोदी

तर घराणेशाही वर बोलताना पंतप्रधान म्हणाले, घराणेशाही मुळे ज्याच्याकडे कौशल्य आहे तो अंधारात राहतो. त्याच्या कौशल्याला योग्य ते स्थान मिळत नाही. त्यामुळे भाई-भतिजा ही घराणेशाही मानसकिता बदलायला हवी. ही देशासाठी चांगली नाही. घराणेशाही संपल्यास योग्य व्यक्तिंना संधी मिळेल, आपल्याला यासाठी घराणेशाही आणि भ्रष्टाचाराशी लढायचे आहे, असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण

 

Back to top button