जय जवान, जय किसान, जय विज्ञाननंतर आता जय अनुसंधान – पंतप्रधान मोदी | पुढारी

जय जवान, जय किसान, जय विज्ञाननंतर आता जय अनुसंधान - पंतप्रधान मोदी

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पर्व आणि स्वातंत्र्य दिनी भारतीयांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक नवा मंत्र दिला. जय जवान, जय किसान, जय विज्ञाननंतर आता जय अनुसंधान हे नव्याने जोडावे. आज देश नवनिर्मातीच्या क्षेत्रात वेगाने पुढे जात आहे. नवनवीन रोजगाराचे क्षेत्र खुलत आहे. हे सर्व नवनवीन अनुसंधानाने शक्य आहे. त्यामुळे आता जय जवान, जय किसान, जय विज्ञान सह जय अनुसंधान ही म्हणायला हवे, असे मोदी यांनी देशवासियांना संबोधित केले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या सर्व भारतवासीयांना शुभेच्छा, पंतप्रधानांचे देशाच्या नावाने संबोधन (पाहा लाईव्ह)

स्वातंत्र्य दिनी आज सकाळी साडेसात वाजता लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर देशाच्या नावे संबोधन करत असताना मोदी यांनी अनेक विविध पैलूंवर भाष्य केले. यावेळी लाल बहाद्दूर शास्त्री यांनी देशाला दिलेल्या जय जवान जय किसान ना-याचा पुनर्रुचार केला तसेच नंतर अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यामध्ये जय विज्ञान जोडले होते. याचा पुनर्रूचार करत आता अमृत कालामध्ये आणखी एक गोष्ट जोडणे महत्वाचे आहे. ती म्हणजे जय अनुसंधान, असे म्हटले आहे.

भारतात उत्पादन क्षेत्रात मोठी प्रगती. आता 5 जीच्या काळात पाऊल ठेवत आहे. प्रत्येक गावाला डिजिटल बनवायचे आहे. टेक्नॉलॉजीचे हब बनण्याकडे भारताची आगेकूच. डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात क्रांती येऊ शकते. आयटी क्षेत्रात भारताने आपले लोहा सिद्ध केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण

Back to top button