‘ते’ देत होते पेस्ट्री केकमधून ड्रग्ज; मुंबईत NCBचा छापा  | पुढारी

‘ते’ देत होते पेस्ट्री केकमधून ड्रग्ज; मुंबईत NCBचा छापा 

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

मालाड येथील एका बेकरीतून पेस्ट्री केकमध्ये गांजा लपवून गिऱ्हाईकाला देण्याच्या तयारीत असतानाच बेकरीवर छापा टाकून एनसीबीने महिलेसह तिघांना अटक केली. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB)ने या ड्रग बेकरीवर मोठी कारवाई केली आहे.

वाचा : इंग्लंडच्या महाराणीने तलवारीने कापला केक

एनसीबी अधिकाऱ्यांना मुंबईच्या मालाड येथील एका बेकरीतून ड्रग्जचा पुरवठा केला जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. याच माहितीच्या आधारावर अधिकाऱ्यांनी कारवाई केली. छाप्यावेळी एका डब्ब्यात अधिकाऱ्यांना १६० ग्रॅम गांजा मिळाला. पोलिसांनी बेकरीतील कर्मचाऱ्यांची कसून चौकशी केली. एनसीबीने शनिवारी ऑर्लेम, मालाड  येथे ८३० ग्रॅम एडिबल वीड पॉट ब्राउन, एडिबल कॅनाबीस व 35 ग्रॅम मारिजुआनाचे एकूण १० नॉन ब्राऊनी केक्स जप्त केले होते.  एल्स्टन फर्नांडिस नावाच्या एका व्यक्तीला अटक केली. पुढील कारवाईदरम्यान एनसीबीने वांद्रे येथील जगत चौरसिया  या मुख्य पुरवठादारास शनिवारी रात्री उशिरा १२५ ग्रॅम मारिजुआनासह ताब्यात घेतले.

वाचा : प.बंगाल: भाजपवर आरोप करत पक्षांतरासाठी रांगा

ब्रॉनी वीड पॉट केक्सद्वारे तरुण पिढीतील पदार्थांचे सेवन करण्याचा एक नवीन ट्रेंड शोधून काढला. त्यानुसार ड्रग्स मिश्रित केक्स तयार केले जात असल्याचे समोर आले. ड्रग्जचा वापर करून हे केक तयार केले जात होते. या प्रकरणी एनसीबीने गुन्हा दाखल केला आहे. संबंधित बेकरीतून केक आणि पेस्ट्रीद्वारे हाय प्रोफाईल परिसरातील नागरिकांना ड्रग्ज पुरवठा केला जायचा. एनसीबी अधिकाऱ्यांनी बेकरीतील सर्व अंमली पदार्थ जप्त केले असून तिघांना अटक केली आहे. 

वाचा : ‘मला सहन होत नाही, मी आत्महत्या करतेय’, व्हिडीओ शेअर करत तरुणीने केली आत्महत्या

Back to top button