सर्वसामान्यांना बसणार महागाईचा झटका, आळणी जेवणाला चव आणणारे मीठ महागणार | पुढारी

सर्वसामान्यांना बसणार महागाईचा झटका, आळणी जेवणाला चव आणणारे मीठ महागणार

पुढारी ऑनलाईन: महागाईच्या गर्तेत अडकलेल्या जनतेला आणखी एक नवा धक्का बसणार आहे. देशात मीठ महाग होणार आहे. एका रिपोर्ट्सनुसार, टाटा मिठाच्या किमती वाढवणार आहेत. महागाईचे कारण कंपनीने आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सचे एमडी आणि सीईओ सुनील डिसूझा यांनी टाटा सॉल्टच्या किमती वाढू शकतात असे म्हटले आहे. महागाईच्या दबावाला तोंड देण्यासाठी कंपनीला हा निर्णय घ्यावा लागल्याचे ते म्हणाले. त्याच्या उत्पादनावरील मार्जिन सुरक्षित करण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागल्याचे त्यांनी म्हटले आहे.

एनर्जी आणि ब्राइन – मिठाच्या किमती दोन गोष्टींवर अवलंबून असतात

डिसोझा यांच्या मते, दोन गोष्टी मिठाची किंमत ठरवतात. यातील पहिला ब्राइन आणि दुसरा ऊर्जा हा आहे. ब्राइनच्या किमती सध्या स्थिर आहेत पण ऊर्जा महाग होत चालली आहे. त्यामुळे मिठाच्या दरात वाढ झाली आहे. टाटा कंझ्युमरच्या सीईओच्या म्हणण्यानुसार, यामुळेच त्यांना या किमती वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.

सध्या टाटा मिठाचा भाव 28 रुपये किलो आहे.

मात्र, कंपनीच्या किमती कधी आणि किती वाढतील हे कंपनीकडून सांगण्यात आलेले नाही. बाजारात सध्या एक किलो टाटा मिठाची किंमत 28 रुपये प्रति किलो आहे. टाटा कंझ्युमरने बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, कंपनीचा वार्षिक नफा 38 टक्क्यांनी वाढून 255 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. आता कंपनीच्या उत्पादनांच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांवर महागाईचा बोजा पडणार हे निश्चित झाले आहे.

Back to top button