ठाकरे गटाची मागणी निवडणूक आयोगाकडून मान्य; कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी ४ आठवड्यांची मुदत | पुढारी

ठाकरे गटाची मागणी निवडणूक आयोगाकडून मान्य; कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी ४ आठवड्यांची मुदत

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : शिवसेनेवरील प्रभुत्व सिद्ध करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाने मागितलेली चार आठवड्यांची मुदत केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्य केली आहे. याआधी शिंदे आणि ठाकरे गटातील वादावरील याचिका निकाली निघाल्याशिवाय कोणताही ठोस निर्णय घेऊ नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले होते, हे विशेष!

शिंदे गटाने निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रातून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर दावा केला आहे. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयातही ठाकरे-शिंदे गटातील वादाच्या विविध याचिकांवर सुनावणी सुरू आहे. शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे दिलेल्या अर्जावर सोमवारी सुनावणी नियोजित होती. मात्र, उद्धव ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचा हवाला देण्यात आला आणि कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी आणखी 4 आठवड्यांची मुदत मागितली गेली. आयोगाच्या निर्देशानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या समर्थक पदाधिकार्‍यांना पाठिंब्याचे शपथपत्र देण्याचे आवाहन केलेले आहे. ठाकरे गटाकडून अन्य आवश्यक कागदपत्रेही जमा केली जात आहेत.

Back to top button