तेजस चालले सातासमुद्रापार! अमेरिकेसह जगातील सात देशांची मागणी | पुढारी

तेजस चालले सातासमुद्रापार! अमेरिकेसह जगातील सात देशांची मागणी

भारतीय शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांनी तयार केेलेल्या तेजस या संपूर्ण देशी बनावटीची तेजस विमाने जगातील एकमेव महाशक्ती असलेल्या अमेरिकेसह ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, इजिप्त, इंडोनेशिया, मलेशिया आणि फिलिपाईन्स या देशांनी खरेदी करण्यात स्वारस्य दाखवले आहे. देशाचे दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी यांनी 2003 साली विमानाचे नामकरण तेजस असे केले होते.

‘तेजस’ची खासियत

वेग : प्रतितास 2205 कि.मी.
उड्डाणाची कमाल उंची : 50 हजार फूट
वजन : 6 हजार 500 किलो
किंमत : सुमारे 550 कोटी रुपये
अंतर क्षमता : एकाच उड्डाणात सलग 3000 किलोमीटर अंतर

खास वैशिष्ट्ये
  • कार्बन फायबर, टिटॅनियम व अ‍ॅल्युमिनिमच्या वापरामुळे वजन कमी, मात्र अधिक शक्तिशाली
  • सेल्फ प्रोटेक्शन जॅमरच्या कवचामुळे जमीन किंवा हवाई हल्ल्यांपासून पूर्णपणे सुरक्षित
  • वेगमर्यादा 500 कि.मी. असली तरी 50 हजार फूट उंचीवरही हवेत इंधन भरण्याची क्षमता
  • लेसर गाईडेड बॉम्ब, गाईडेड बॉम्ब, क्लस्टर शस्त्रे, ब्राह्मोस, क्रूझ यासारखे घातक क्षेपणास्त्रे वाहून नेण्यास सज्ज
  • अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे एकाच वेळी शत्रूवर 10 हल्ले करण्याची अफलातून क्षमता
  • केवळ 450 कि.मी.च्या धावपट्टीवरही उतरू शकते

1983 पासून हलक्या स्वरूपाचे लढाऊ विमान तयार करायला भारताने सुरुवात केली आणि 18 वर्षांच्या अविश्रांत परिश्रमानंतर हे स्वप्न वास्तवात उतरले आहे.

Back to top button