Murder Bihar in Madhepura : पत्नी-मुलीचा गळा चिरून काढला सेल्फी | पुढारी

Murder Bihar in Madhepura : पत्नी-मुलीचा गळा चिरून काढला सेल्फी

मधेपुरा; वृत्तसंस्था : बिहारच्या मधेपुरामध्ये एका व्यक्‍तीने पत्नी आणि मुलीची गळा चिरून हत्या केली. एवढेच नव्हे तर त्यानंतर त्याने मृतांसमवेत सेल्फी काढला. पत्नीचे शीर कापून ते सासूरवाडीत पाठविले तर मुलीचे शीर टेबलवर ठेवले होते. त्यानंतर तो पसार झाला. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपीने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये पत्नीचे आणि मुलीचे धड आणि शीर वेगळे केल्याचे दिसत आहे. आरोपीचे नाव जिब्राईल असून पत्नीचे नाव रूकसाना (वय30) आणि मुलीचे नाव जिया (वय 4) आहे. (Murder Bihar in Madhepura)

घटनास्थळी एक पत्र मिळाले असून धक्‍कादायक बाबी लिहिल्या असून त्याबरोबर ‘शानदार’ आणि ‘जबरदस्त’ असे लिहिले आहे. दोघांचे लग्‍न होऊन 12 वर्षे झाली असून त्यांना तीन मुले आहे.

हेही वाचा

Back to top button