Karnataka : भाजप नेत्याच्या हत्येचा तपास लवकरच एनआयएकडे – बसवराज बोम्मई | पुढारी

Karnataka : भाजप नेत्याच्या हत्येचा तपास लवकरच एनआयएकडे - बसवराज बोम्मई

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटकातील भाजपच्या युवा मोर्चा समितीचे सदस्य प्रवीण नेत्तर यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महत्वपूर्ण विधान केले आहे. बसवराज बोम्मई म्हणाले की, प्रवीण नेत्तर यांच्या हत्येचा तपास आम्ही लवकरच एनआयएकडे सुपूर्द करणार आहोत. भाजप नेते प्रवीण नेत्तर यांची २६ जुलैला कर्नाटकच्या सुलिया येथे हत्या करण्यात आली होती. प्रवीण नेत्तर हे भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सचिव होते. (Karnataka)

प्रवीण त्यांचे दुकान बंद करत असताना त्यांची हत्या करण्यात आली होती. अद्याप प्रवीण नेत्तर यांच्या हत्येमागील कारण समजू शकलेले नाही. याप्रकरणी आत्तापर्यंत दोन मुस्लीम व्यक्तींना अटक करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. भाजप नेत्याच्या परिवाराच्या सदस्यांप्रती कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी संवेदना व्यक्त केली आहे. (Karnataka)

तसेच प्रवीण नेत्तर यांनी लवकरात लवकर न्याय मिळेल, असे आश्वासनही बोम्मई यांनी दिले आहे. भाजप युवा नेते प्रवीण नेत्तर यांचे एक दुकान होते. या दुकानासमोर भाजर युवा मोर्चाचे कार्यकर्ते प्रवीण याच्या हत्येला विरोध करण्यासाठी मोठ्या संख्येने एकत्रित आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘आम्हाला न्याय हवा आहे’ अशा घोषणाही दिल्या. (Karnataka)

हेही वाचलंत का?

Back to top button