...तर 5 हजार रुपये विलंब शुल्क | पुढारी

...तर 5 हजार रुपये विलंब शुल्क

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था ऑगस्ट महिना सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले असून, चार महत्त्वाच्या निर्णयांमुळे मोठे बदल होऊ घातले आहेत. त्यानुसार करदात्यांनी 31 जुलैनंतर म्हणजेच 1 ऑगस्टपासून आयटीआर दाखल केल्यास त्यांना विलंब शुल्क भरावे लागेल. वैयक्‍तिक करदात्याचे वार्षिक उत्पन्‍न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर त्याला 5,000 रुपये विलंब शुल्क भरावे लागेल. तसेच करदात्याचे वार्षिक उत्पन्‍न 5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तर त्याला विलंब शुल्क म्हणून 1 हजार रुपये भरावे लागणार आहेत.

दुसरा विषय म्हणजे बँक ऑफ बडोदा 1 ऑगस्टपासून चेक पेमेंट नियमांमध्ये काही बदल करणार आहे. बँकेने आपल्या ग्राहकांना सांगितले की, 1 ऑगस्टपासून 5 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रकमेच्या धनादेशाच्या पेमेंटसाठी सकारात्मक वेतन प्रणाली अनिवार्य असणार आहे. चेक पेमेंट सुरक्षित करण्यासाठी आणि बँक फसवणूक टाळण्यासाठी हे बदल केले जात आहेत.

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या केवायसीसाठी 31 जुलैची वेळही देण्यात आली आहे; अन्यथा पीएम योजनेच्या 12 व्या हप्त्याचे पैसे शेतकर्‍यांना मिळणार नाहीत. 1 ऑगस्टपासून शेतकरी केवायसी करू शकणार नाहीत.

एक ऑगस्टपासून होणार चार महत्त्वाचे बदल

सिलिंडर महागण्याची शक्यता

एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीचा दर महिन्याच्या 1 तारखेला आढावा घेतला जातो. अशा परिस्थितीत नैसर्गिक वायूच्या वाढत्या किमतींमुळे यावेळी घरगुती आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या सिलिंडरच्या किमती वाढू शकतात.

हेही वाचा

Back to top button