मध्य प्रदेश, महाराष्ट्रपाठोपाठ ममतांच्या बंगालमध्येही ‘ऑपरेशन कमळ?’ | पुढारी

मध्य प्रदेश, महाराष्ट्रपाठोपाठ ममतांच्या बंगालमध्येही ‘ऑपरेशन कमळ?’

कोलकाता, वृत्तसंस्था : मध्य प्रदेश, महाराष्ट्रानंतर आता ममता बॅनर्जींच्या पश्‍चिम बंगालमध्येही ‘ऑपरेशन कमळ’ राबविले जाते की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. अभिनेते तसेच राज्यातील भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांनी केलेल्या दाव्यानंतर बंगालमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तृणमूल काँग्रेसचे 38 आमदार माझे घनिष्ट असून, 21 आमदार माझ्या संपर्कात आहेत, असे विधान मिथुन चक्रवर्ती यांनी बुधवारी केले आणि हा एकच राजकीय धुरळा उडाला!

कोलकात्यात माध्यम प्रतिनिधींच्या घोळक्याला उद्देशून मिथून म्हणाले, तुम्हाला ब्रेकिंग न्यूज हवी आहे काय? तर ऐका… 38 तृणमूल आमदार मला अत्यंत जवळचे आहेत आणि यातील 21 तर थेट माझ्या संपर्कात आहे. ते पुढे म्हणाले की, सध्या 18 राज्यांत भाजपचे सरकार आहे आणि लवकरच आणखी 4 राज्यांत भाजपचे सरकार असेल.

मिथुन चक्रवर्ती यांच्या वक्‍तव्यावर तृणमूल खासदार शांतनू सेन यांनी, काही दिवसांपूर्वी मिथुन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; पण मला वाटते ते शारीरिक नव्हे, तर मानसिकरित्या आजारी आहेत.

Back to top button