५ सप्टेंबरपूर्वी सर्व शिक्षकांचे लसीकरण करा | पुढारी

५ सप्टेंबरपूर्वी सर्व शिक्षकांचे लसीकरण करा

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : कोरोनामुळे शाळा सुरू करण्यावर मर्यादा येत असल्याने शिक्षकांचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लसीकरण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शिक्षक दिन म्हणजेच ५ सप्टेंबर आधी शिक्षकांचे लसीकरण करावे अशा सूचना राज्यांना दिल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी याबाबत ट्विट करून राज्यांना सूचना केल्या आहेत.

केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, यापुढे प्रत्येक राज्याला लस उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या लशींमध्ये दोन कोटी डोसची संख्या वाढविली जाईल.

त्यामुळे प्रत्येक राज्याने ५ सप्टेंबर आधी सर्व शिक्षकांचे लसीकरण करण्याला प्राधान्य द्यायला हवे.

महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यातील माध्यमिक आणि प्राथमिक शाळा बंद आहेत.

मध्यंतरी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरू करण्याचे आदेश काढले होते.

मात्र, कोरोना संसर्गाचा धोका असल्याने शाळा सुरू करण्यास पेडियाट्रिक टास्क फोर्सने विरोध केला होता.

राज्यात बहुतांश शिक्षकांचे लसीकरण केले आहे. तरीही शाळा सुरू करण्याबाबत अद्याप संभ्रम आहे.

काही शिक्षकांना कोरोना काळात ड्युटी करावी लागल्याने त्यांचे लसीकरण करण्यात आले होते.

हेही वाचा: 

Back to top button