

पुढारी ऑनलाईन डेस्क : सीबीएसई बोर्डाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेत मयांक यादव देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. मयांक १०० टक्के गुण मिळवत ही परिक्षा उत्तीर्ण झाला आहे. मयांक यादव हा एमटी इंटरनॅशनल स्कूल, नोएडा या शाळेचा विद्यार्थी आहे. सीबीएसई बोर्डाकडून दहावीच्या दुसऱ्या सत्राचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. २०२२ या वर्षात एकूण ९४.४० टक्के विद्यार्थ्यांना दहावीची परिक्षा उत्तीर्ण होण्यात य़श आले आहे. हा निकाल सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईटवर घोषित करण्यात आला.
यंदाच्या १० वी च्या निकालातही मुलींनी बाजी मारली. मुलांच्या तुलनेत १.४१ मुलींनी चांगले मार्क्स मिळवले आहेत. मुलींमधील उत्तीर्ण होणऱ्या विद्यार्थीनींचे प्रमाण ९५.२१ टक्के इतके आहे. तर ९३. ८० टक्के विद्यार्थी १० ची परिक्षा उत्तीर्ण झाले आहेत. ९० टक्के तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना १० वी ची परिक्षा उत्तीर्ण होण्यात यश आले आहे.