निवृत्तीनंतर रामनाथ कोविंद कुठे राहणार? पेन्शन आणि कोणत्या सुविधा मिळणार, जाणून घ्या... | पुढारी

निवृत्तीनंतर रामनाथ कोविंद कुठे राहणार? पेन्शन आणि कोणत्या सुविधा मिळणार, जाणून घ्या...

पुढारी ऑनलाईन: राष्ट्रपती निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. एनडीएचे उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधी पक्षाकडून असलेले यशवंत सिन्हा यांच्यात निर्णय होणार आहे. निकालानंतर देशाला नवीन राष्ट्रपती मिळणार आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलैला संपणार आहे. २३ जुलै रोजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन करणार आहेत.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व केंद्रीय मंत्री आणि खासदार उपस्थित राहणार आहेत. कार्यकाळ संपण्याच्या दोन दिवस आधीच म्हणजे २२ जुलै रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे सर्व सामान नवीन बंगल्यावर हलविण्यात येणार आहे. परंतु कोविंद हे राष्ट्रपती भवनातून अधिकृतरित्या २४ जुलै रोजी निरोप घेतील. चला तर मग जाणून घेऊया राष्ट्रपती कोविंद यांचे नवीन घर कुठे असणार आहे? त्याची खासियत काय? रिटायरमेंटनंतर त्यांना पेन्शन किती? कोणत्या सुविधा मिळणार?

रिटायरमेंटनंतर राष्ट्रपती कोविंद कुठे राहणार ?

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपल्यानंर त्यांना दिल्लीतील १२ जनपथ येथे बंगला देण्यात आला आहे. तो हाच बांगला आहे, जिथे काही वर्षांपूर्वी रामविलास पासवान राहत होते. पासवान या बंगल्यात दोन दशकाहून अधिक काळ राहिले. पासवान यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाने हा बांगला खाली केला. आता हा बांगला रामनाथ कोविंद याना देण्यात आला आहे. या बंगल्याला पूर्णपणे नव्याने डिझाईन करण्यात आले आहे. राष्ट्रपती यांची मुलगी स्वाती कोविंद यांनी बंगल्याच्या नूतनीकरणाचे काम पाहिलं आहे. या बंगल्याच्या जवळच म्हणजे १० जनपथ येथे काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे निवासस्थान आहे.

कोणत्या सुविधा मिळणार ?

राष्ट्रपती कोविंद यांना रिटायरमेंटनंतर १.५ लाख रुपये दर महिन्याला पेन्शन मिळणार आहे. याशिवाय सेक्रेटेरियल स्टाफ आणि कार्यालयीन खर्चासाठी ६० हजार रुपये प्रतिमहिना दिला जाणार आहे. याशिवाय सरकारने दिलेला बंगलाही मोफत असेल. माजी राष्ट्रपती असल्यामुळे रामनाथ कोविंद याना लँडलाईन, मोबाईल फोन, ब्रॉडबँड आणि इंटरनेट कनेक्शनही दिले जाणार आहे. याशिवाय वीज आणि पाण्याचे बिलही भरावे लागणार नाही. विशेष म्हणजे रामनाथ यांना कार आणि ड्रायव्हर देण्यात येणार आहे.

  • रामनाथ कोविंद यांना रिटायरमेंटनंतर मिळणाऱ्या आणखी काही सुविधा –
  • आरोग्य सुविधा पूर्णपणे मोफत असतील.
  • रेल्वे आणि विमान सेवा मोफत असेल. माजी राष्ट्रपतीसोबत अन्य एका कर्मचाऱ्याला ही सुविधा मोफत मिळणार आहे.
  • पाच जणांचा पर्सनल स्टाफ असेल. याशिवाय सर्व सुविधायुक्त असलेले वाहन मोफत दिले जाणार आहे
  • दिल्ली पोलिसांच्या सुरक्षेबरोबर दोन सचिव देखील सोबत असतील

हेही वाचा

नॅशनल हेराल्‍ड प्रकरणी सोनिया गांधी यांची ईडीकडून अडीच तास चौकशी

नवीन राष्ट्रपतींना कोण शपथ देतात? राष्ट्रपतींना कोणते अधिकार, किती पगार आणि कोणत्या सुविधा मिळतात, जाणून घ्या सविस्तर

WhatsApp ची नवी सुविधा! संपूर्ण चॅट हिस्ट्री Android वरून ट्रान्सफर करता येणार!

Back to top button