MP Municiple Election : नगरपालिका निवडणुकीतील पराभव लागला जिव्हारी, मध्‍य प्रदेशमधील काँग्रेस उमेदवाराचा ह्रदयविकाराने मृत्यू | पुढारी

MP Municiple Election : नगरपालिका निवडणुकीतील पराभव लागला जिव्हारी, मध्‍य प्रदेशमधील काँग्रेस उमेदवाराचा ह्रदयविकाराने मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशच्या रेवा जिल्ह्यातील  नगरपालिकेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेस उमेदवाराचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. हरी नारायण असे या उमेदवाराचे नाव आहे. नगरपालिकेच्या के वार्ड क्रमांक 9 मधून काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी दिली होती. अपक्ष उमेदवार अखिलेश गुप्ता यांनी 14 मतांनी त्यांचा पराभव केला. पराभव झाल्याचे समजताच हरी नारायण यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. (MP Municiple Election)

मध्य प्रदेशमध्ये आम आदमी पक्षाची वाढ

आम आदमी पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून मध्य प्रदेशच्या राजकारणात इंट्री केली आहे. सिंगरोली येथून आपच्‍या उमेदवार राणी अग्रवाल यांनी 9159 मतांनी मोठा विजय मिळवला. राणी अग्रवाल यांनी काँग्रेसचे उमेदवार चंदेल यांचा पराभव केला. आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल स्वत: निवडणुकीच्या प्रचारासाठी मध्य प्रदेशमध्ये आले होते. सिंगरोली येथे त्यांनी रोड शोदेखील केला होता. (MP Municiple Election)

खंडवा येथे ‘एमआयएम’च्या उमेदवार विजयी

एमआयएमने जबलपूरच्या दोन जागांवर विजय मिळवला आहे. एमआयएमने पहिल्यांदाच मध्य प्रदेशच्या शहरी भागात विजय मिळवला. एमआयएमच्या महिला उमेदवार शकीरा बिलालने खंडवा नगरपालिकेच्या वार्ड क्रमांक १४ मधून काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला.  ओवेसींच्या एमआयएमने जबलपूरमधून दोन जागांवर विजय मिळवला आहे. (MP Municiple Election)

हेही वाचलंत का ?

Back to top button