Aryan Khan Durgs Case : आर्यन खानला दिलासा; पासपोर्ट परत करण्याचे NDPS कोर्टाचे आदेश

Aryan Khan Durgs Case : आर्यन खानला दिलासा; पासपोर्ट परत करण्याचे NDPS कोर्टाचे आदेश

Aryan Khan Durgs Case : पुढारी ऑनलाइन डेस्क : आर्यन खानला ड्रग्स केसमध्ये मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष NDPS कोर्टाने पासपोर्ट परत करण्याचे आदेश दिले आहेत. जे कार्डेलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणात (Aryan Khan Durgs Case) जप्त करून कोर्टाकडे जमा करण्यात आले होते.  मुंबईहून गोवाकडे जाणा-या क्रूज शिपवर 2 ऑक्टोबर 2021 ला एनसीबीने छापा टाकून कारवाई केली होती. याप्रकरणात आर्यनसह आठ जणांना अटक करण्यात आले होते.

Aryan Khan Durgs Case याप्रकरणी जवळपास चार आठवडे आर्यन तुरुंगात होता. एनसीबी कडून त्यावर ड्रग्स ट्रेडिंगचे आरोप ठेवण्यात आले होते. 30 ऑक्टोबरला 2021 ला जामीनवर सुटल्यानंतर त्याला 27 मे 2022 ला या प्रकरणी क्लिन चीट मिळाली होती. दरम्यान, आज विशेष एनडीपीएस न्यायालयाकडून आर्यनचा पासपोर्ट परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Aryan Khan Durgs Case : या प्रकरणात आर्यन खानसह एकूण सहा जणांना पुराव्या अभावी क्लीन चीट देण्यात आली होती. तर अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना क्लिन चीट मिळाली नव्हती. या प्रकरणात एकूण 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात येणार होता.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news