

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री चौपाटीवर ठरत नाही. तो नरिमन पॉईंट येथील पवित्र अशा विधिमंडळात ठरतो. जनता मुख्यमंत्री ठरवते. चौपाटीची भाषेचा वापर न करता मुख्यमंत्री पदाचे पावित्र्य रखा, असे खरमरीत प्रत्युत्तर बंडखोर एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी संजय राऊत यांना दिले.
गटाला मान्यता मिळाल्यावर १०० टक्के मुंबईत येणार आहे. कुणाच्या दबावाखाली आम्ही बंड केलेले नाही, या पुनरुच्चार करत आम्ही सर्व शिवसेनेचेच सदस्य असल्याचे पुन्हा सांगितले. एकनाथ शिंदे यांनी आमच्यावर बळजबरी केलेली नाही. आम्ही सर्वजण जे शिंदे गटासोबत आहोत ते स्वत:च्या मनाने आलेलो आहे. शिवसेनेच्या आमदारांवर अन्याय होत आला आहे. कोकणातील अनेक कामे रखडली आहेत, या आणि अशा अनेक तक्रारी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली पण त्याकडे दुर्लक्ष झाले, ती खदखद केसरकर यांनी पुन्हा व्यक्त केली.