द्रौपदी मुर्मू यांनी केली मंदिराची स्वच्छता | पुढारी

द्रौपदी मुर्मू यांनी केली मंदिराची स्वच्छता

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भाजपने राष्ट्रपतीपदासाठी घोषित केलेल्या उमेदवारी द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी आपल्या रायरंगपूर मतदारसंघातील जगन्‍नाथ आणि शिव मंदिराचे दर्शन घेतले. शिव मंदिरात त्यांनी हातात झाडू घेऊन परिसराची स्वच्छता केली.

द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांना केंद्र सरकारने झेड प्लस सुरक्षा पुरविली असून, त्यांच्या निवासस्थानाचा ताबा केंद्रीय सुरक्षा दलाने घेतला आहे. मंगळवारी संध्याकाळी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांचा त्यांना फोन आला आणि उमेदवारीबाबत माहिती दिली. तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले, क्षणभर त्या काही बोलू शकल्या नाहीत. नंतर फक्‍तत्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले, अशी माहिती त्यांच कन्या इतिश्री हिने दिली. झोपडीत राहणारी एक महिला थेट राष्ट्रपती भवनापर्यंत पोहचेल.

Back to top button