शिवसेनेच्या आदेशाला एकनाथ शिंदेंचे आव्हान, म्हणाले… | पुढारी

शिवसेनेच्या आदेशाला एकनाथ शिंदेंचे आव्हान, म्हणाले...

पुढारी ऑनलाईन डेस्क : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने विधीमंडळ पक्षाची बैठक आज (बुधवार) संध्याकाळी ५ वाजता वर्षा बंगल्यावर बोलवली आहे. या बैठकीला हजर राहण्याबाबत शिवसेना मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी पत्र जारी केले आहे. या बैठकीला आपण उपस्थित न राहिल्यास आपण स्वेच्छेने शिवसेना पक्षाचे सदस्यत्व सोडण्याचा तुमचा स्पष्ट इरादा आहे, असे मानले जाईल आणि परिणामी आपणावर भारतीय संविधानातील सदस्यांच्या अपात्रतेच्या संदर्भात असलेल्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा या पत्राद्वारे देण्यात आला आहे.

या बैठकीबाबतचे पत्र आमदारांच्या ई मेलवर, समाज माध्यमाद्वारे, व्हाट्सअपवर पाठविण्यात आले आहे. या बैठकीला लिखित स्वरूपात आणि वैध आणि पुरेशी कारणे असल्याशिवाय गैरहजर राहता येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

पण या आदेशाला एकनाथ शिंदे यांनी अवैध असल्याचे म्हटले आहे. शिंदे यांनी ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार श्री.भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत.’

Back to top button