

पुढारी ऑनलाईन डेस्क : नॅशनल हेराल्ड प्रकरणी सलग पाचव्यांदा ईडीच्या चौकशीला सामोरे गेलेले काँग्रेस नेते राहुल गांधींनी ईडी सारख्या एजन्सींचा माझ्यावर परिणाम होत नसल्याचे स्पष्ट केले. ईडीच्या ज्या अधिकाऱ्यांनी माझी चौकशी केली त्यांनाही समजले असेल की काँग्रेस पक्षाच्या नेत्याला घाबरवले जाऊ शकत नाही. आणि माझा आवाज दाबला जाऊ शकत नाही. असे देखील त्यांनी सांगितले.
भाजप सरकार 'वन रँक, वन पेन्शन'च्या गप्पा मारतं, पण आता 'नो रँक आणि नो पेन्शन' आहे. तरुण कठोर परिश्रम करतील आणि त्यांच्या घरी परत जातील. एकदा निवृत्त झाल्यावर त्यांना रोजगार मिळणार नाही. केंद्र सरकार देशाच्या सैन्याला कमकुवत करत आहेत आणि ते म्हणतात की आम्ही राष्ट्रवादी आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अग्निपथ योजना मागे घ्यावीच लागेल. देश मजबूत करण्यासाठी खरी देशभक्ती आवश्यक आहे, याची जाणीव भारतातील तरुणांना आहे. ही योजना रद्द केली जाईल याची खात्री करून घेऊ, असेही राहुल गांधी म्हणाले.
हेदेखील वाचा