World photography day 2021 : एक अंड मेस्सी आणि कायली जेनरवर पडलंय भारी | पुढारी

World photography day 2021 : एक अंड मेस्सी आणि कायली जेनरवर पडलंय भारी

जागतिक छायाचित्र दिन (World photography day 2021) १९ आगष्ट रोजी साजरा करतात. या दरम्यान जगभरातील अनेक छायाचित्र प्रेमी, छायाचित्रकार, कथीत छायाचित्रकार आपले कॅमेरे बाहेर काढून फोटो काढण्यासाठी सरसावतात. हे फोटो इंस्टाग्रामवर टाकून लाईस्क आणि कमेंटस् मिळवण्याची स्पर्धा सुरू होते.

पण सर्वाधिक आवडलेल्या इन्स्टाग्राम फोटोसाठी खेळ सुरू करूया. आपल्याला माहीत आहे का या खेळामध्ये आपण कोणाबरोबर स्पर्धा करत आहे. आपण ज्याबरोबर स्पर्धा करणार आहोत ते एक अंडे आहे. होय तो एक कोंबडीचे अंडे. या अंड्याने इंस्टाग्रामवर सर्वाधिक लाईक्स आणि कमेंट मिळवल्या आहेत.

या अंड्याचा इंस्टाग्रामवर भाव चांगलाच वधरलाय

इंस्टाग्रामवर सर्वाधिक लाईक व कमेंटस् मिळवण्याच्या शर्यतीत या अंड्याच्या फोटोने कायली जेनर, लिओनेल मेस्सी, एरियाना ग्रांडे आणि बिली आयलिश सारख्या सेलिब्रिटींना मागे टाकले आहे. हा विक्रम आजपर्यंत कोणीही मोडू शकलेला नाही.

अंड्याची ही प्रतिमा World record egg या इंस्टाग्राम हँडलद्वारे शेअर केलीली पहिली पोस्ट होती. कॅप्शनमध्ये असे लिहिले होते की, “चला एकत्रितपणे एक विश्वविक्रम प्रस्थापित करू या आणि इंस्टाग्रामवर सर्वाधिक लाईक केलेली पोस्ट आपण बनवूया. कायली जेनरचे (१८ मिलियन) वर्ड रेकार्ड मोडायचे आहे. ……’ आज या फोटोला ५५ मिलियन पेक्षा जास्त लाईकक्स मिळाले आहेत.

मेस्सीलाही अंड्याने दिली मात

आतापर्यंत कोणताही सेलिब्रिटी फोटो इथेपर्यंत पोहचलेला नाही. या अंड्यानंतर सगळ्यात जास्त पसंत केलेल्या इंस्टाग्राम फोटोच्या सध्याच्या यादीत एरियाना ग्रांडे पुढे आहे. तिने केलेल्या डाल्टन गोमेझसोबतच्या लग्नातील फोटोंच्या अल्बमला आतापर्यंत २६.७ मिलियन लाइक्स मिळाले आहेत.

सेलिब्रिटी बिली आयलीश आणि स्टार फुटबॉल खेळाडू लिओनेल मेस्सी देखील टॉप १० च्या यादीत आहेत. परंतु, आपल्या या अंड्याने प्रस्थापित केलेल्या विश्वविक्रमापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना अजून बराच पल्ला गाठायचा आहे.

जागतिक छायचित्रणाची सुरवात कधी झाली (World photography day 2021)

आज पासून १७७ वर्षा आधी १८३९ मध्ये फोटोग्राफीला सुरुवात झाली. फ्रांसने १८३९ मध्ये या फोटोग्राफीला मान्यता दिली. या मान्यतेनंतर १९ ऑगस्टला जागतिक छायाचित्र दिन साजरा केला जातो. हा दिवस त्या छायाचित्रकारांच्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा करतात. ज्या छायाचित्रकारांनी अनमोल क्षण छायाचित्राच्या रूपात कैद केले त्यांना ते नेहमीसाठी स्मरणात ठेवतात.

काही वर्षांपूर्वी कॅमेऱ्यामधून टिपलेले छायाचित्र हातात येण्यासाठी पंधरा दिवसांची वाट पाहावी लागत होती. परंतू जसा काळ बदलत गेला तशी छायाचित्रणाची माध्यमही बदलत गेली. (World photography day 2021)

रोलचा कॅमेरा, डिजिटल कॅमेरा आणि मोबाईलमध्ये टिपलेले छायाचित्र काही सेकंदांतच आपल्या हातात मिळू लागली. मात्र या कलेमधील मज्जा कायम राहीली. आता थोड्याच दिवसात गणेश उत्सव जवळ आला आहे. या उत्सवाच्या निमिताने अनेक हौशी फोटोग्राफर फोटो काढताना फाहायला मिळत असतात. हे छायाचित्रकार आपले अनमोल क्षण छायाचित्राच्या रुपात कैद करतात. त्यांना नेहमीसाठी स्मरणात ठेवले.

Back to top button