jothimani : दिल्ली पोलिसांनी माझे कपडे फाडले; काँग्रेस महिला खासदाराचा आरोप | पुढारी

jothimani : दिल्ली पोलिसांनी माझे कपडे फाडले; काँग्रेस महिला खासदाराचा आरोप

नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन : नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांची ईडीकडून दोन दिवसांपासून चौकशी सुरू आहे. या विरोधात काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. या दरम्यान दिल्लीमध्ये आंदोलन करताना काँग्रेसच्या महिला खासदारसोबत (jothimani)  दिल्ली पोलिसांनी गैरवर्तन केल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यावरून आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत पक्षनेत्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तर काही नेत्यांनी व्हिडिओ प्रसिद्ध करून पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला आहे.

पक्षाचे खासदार शशी थरूर यांनी पक्षाच्या एका महिला खासदाराचा (jothimani) व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती पोलिसांवर गैरवर्तनाचा आरोप करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत शशी थरूर यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
त्यांनी ट्विट केले आहे की, कोणत्याही लोकशाहीत हे अपमानास्पद आहे. महिला आंदोलकाला अशी वागणूक देणे हे प्रत्येक भारतीय शिष्टाचाराचे उल्लंघन करते, परंतु लोकसभा खासदारासोबत असे वर्तन करणे, ही नवीन खालची गोष्ट आहे. मी दिल्लीत आहे. पोलिसांच्या वर्तनाचा निषेध करतो आणि सभापतींनी याबाबत कारवाई करावी.

या व्हिडिओमध्ये तामिळनाडूमधील करूरमधील काँग्रेस खासदार जोथिमणी यांनी आरोप केला आहे की, दिल्ली पोलीस कर्मचाऱ्याने त्यांचे कपडे फाडून त्यांना गुन्हेगाराप्रमाणे घेऊन गेले. यावेळी जोथिमणी यांनी आपला फाटलेला कुर्ता दाखवत म्हटले आहे की, दिल्ली पोलिसांनी काल आमच्यावर क्रूरपणे हल्ला केला. त्यांनी माझे कपडे फाडले, माझे बूट काढले आणि मला इतर महिला आंदोलकांसह एका गुन्हेगाराप्रमाणे बसमध्ये नेले.

jothimani पाणी देण्यास नकार दिला

पोलिसांनी पाणी देण्यासही नकार दिल्याचा आरोप करत त्या म्हणाल्या की, बसमध्ये माझ्यासह ७ ते ८ महिला होत्या. आम्ही वारंवार पाणी मागत आहोत, मात्र त्यांनी नकार दिला. आम्ही बाहेरून पाणी आणण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी विक्रेत्यांना आम्हाला पाणी देऊ नका, असे सांगितले. या व्हिडिओमध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना संपूर्ण प्रकरणाकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात राहुल गांधी ईडीसमोर हजर झाले आहेत. त्याचवेळी सत्ताधारी भाजपच्या सूडाच्या राजकारणाविरोधात पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button