Latest
सर्व्हायकल कॅन्सरवरील पहिल्या स्वदेशी लसीला मंजुरीची शिफारस
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय औषध नियामक संचालनालयाच्या विषय तज्ज्ञ समितीने सर्व्हायकल कॅन्सरवरील उपचारासाठी सीरम इन्स्टिट्यूटच्या (पुणे) 'क्वॉड्रिव्हँलेंट ह्युमन पॅपिलोमा व्हायरस' या लसीला मंजुरी देण्याची शिफारस केली आहे.
सर्व्हायकल कॅन्सरच्या उपचारात भारतात तयार झालेली (स्वदेशी) ही पहिली लस आहे. नऊ ते 26 वर्षे वयाचय सर्व्हायकल कॅन्सर रुग्णांच्या उपचारात ती वापरली जाईल. ही लस चालू वर्षाअखेरपर्यंत बाजारात येण्याची शक्यता आहे. सर्व्हायकल कॅन्सर हा 15 ते 44 वयोगटातील महिलांना सर्वाधिक जडणारा दुसर्या क्रमांकाचा कर्करोग आहे.

