आरोग्यासाठी घातक ठरणार्‍या प्लास्टिकला १ जुलैपासून गुड बाय! | पुढारी

आरोग्यासाठी घातक ठरणार्‍या प्लास्टिकला १ जुलैपासून गुड बाय!

भारतात 1 जुलैपासून सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घालण्याची घोषणा केंद्र सरकारने केली असून त्यामुळे प्रामुख्याने प्लास्टिकच्या स्ट्रॉ आणि अन्य साधनांचा वापर करणार्‍या कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यांनी सरकारचे मन वळवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ चालवली आहे. मात्र, सरकार आपल्या निर्णयावर ठाम आहे. या सिंगल युज प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरणाची कधीही न भरून येणारी हानी होत आहे.

देशातील एकूण प्रदूषणात प्लास्टिकचा वाटा सर्वाधिक आहे. 2018-19 या वर्षात 30.59 लाख टन आणि 2019-20 या वर्षात देशामध्ये 34 लाख टनांहून अधिक प्लास्टिक कचरा निर्माण झाला. कागदाप्रमाणे प्लास्टिक आपोआप नष्ट होत नाही आणि ते जाळताही येत नाही. समजा प्लास्टिक जाळण्याचा प्रयत्न केला तरी त्यातून मोठ्या प्रमाणात विषारी वायू निघतात. हे वायू मानवी आरोग्याला घातक ठरतात. त्यामुळे रिसायकलिंग आणि साठवून ठेवणे हे दोनच उपाय प्लास्टिकबाबत करता येतात.

 प्लास्टिक

Back to top button