

पुढारी ऑनलाईन डेस्क :
भारताचे वाढलेले लष्करी सामर्थ्य प्रशांत महासागर क्षेत्रता स्थिरता स्थापन करेल. चीनला रोखण्याचे सामर्थ्य फक्त भारताकडेच आहे, असे मत अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी व्यक्त केले. सिंगापूर येथील शांगरी-लॉ डायलॉगमध्ये ( Shangri-La Dialogue ) ते बोलत होते.
यावेळी ऑस्टिन म्हणाले की, "अमेरिकेचे असे मत आहे की, भारताचे वाढलेले लष्करी सामर्थ्य व तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे प्रशांत महासागर क्षेत्रात स्थिरता आणण्यास मदत हाेईल. चीन हा या क्षेत्रात आक्रमक भूमिका घेत आहे. तसेच अवैधरित्या आपल्या सागरी सामर्थ्य वाढवत आहे. चीन हा भारताबरोबरील सीमेवरही आपली स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे."
चीन हा तैवानला आपला हिस्सा मानतो. त्याचबरोबर अन्य देशांच्या प्रदेशावरही दावेदार सांगत आहे. यासाठी या देशाने आक्रमक भूमिका घेतली आहे. चीन हा सागरी सीमांमध्येही आक्रमक भूमिका मांडत आहे. अशा परिस्थितीत अमेरिका हा सदैव आपल्या मित्रांचया पाठिशी आहे, असेही ऑस्टिन यांनी स्पष्ट केले.
चीन सध्या आक्रमक भूमिका घेत आहे. भारताबरोबरही चीनचा सीमावाद सुरु आहे. हा देश लडाख सेक्टरबाबत नेहमीच आक्रमक भूमिका घेत आला आहे. त्याचबरोबर व्हिएतनाम, फिलीपिन्स, ब्रुनेई, मलेशिया या देशांच्या काही प्रदेशांवरही आपला हक्क सांगत आहे. अशा परिस्थिती भविष्यातील आक्रमणे रोखण्यासाठी अमेरिका तयार आहे. आम्हा सदैव आमच्या मित्र देशांबरोबर आहोत. आम्ही सर्वजण सुरक्षा व्यवस्था अधिक पारदर्शी आणि सर्वसमावेश करण्यासाठी एकत्रीत काम करु, असा विश्वासही यावेळी अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी व्यक्त केला.
हेही वाचा :