अन्न सुरक्षेत महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी | पुढारी

अन्न सुरक्षेत महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी

अन्न सुरक्षा क्षेत्रात उत्तम कामगिरी करत महाराष्ट्राने अन्न सुरक्षा निर्देशांकात 70 गुणांसह देशात तिसरे स्थान पटकावले आहे. यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या हस्ते राज्याला पुरस्कार प्रदान करण्यात आला. 82 गुणांसह तामीळनाडू प्रथम, तर 77.5 गुण मिळवून गुजरातने दुसरे स्थान मिळवले.

मानके आणि महाराष्ट्राने मिळवलेले गुण

मनुष्यबळ विकास व संस्थात्मक – 11
अनुपालन -22
अन्न परीक्षण-पायाभूत सुविधा आणि निरीक्षण -10.5
प्रशिक्षण व क्षमता बांधणी -10
ग्राहक सबलीकरण – 16.5
एकूण गुण : 100 पैकी 70

या 11 शहरांचीही सरस कामगिरी

अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने 2021-22 साठी देशातील जिल्हा व शहरांसाठी आयोजित ‘इट राईट चॅलेंज’ स्पर्धेत राज्यातील मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, मिरा-भाईंदर, नवी मुंबई, ठाणे, सोलापूर, वर्धा, औरंगाबाद, नाशिक आणि लातूर या 11 शहरांनी चमकदार कामगिरी करून पुरस्कार पटकाविले.

Back to top button