Subramanian Swamy : अरब देशांविरोधात मोदी सरकार उभे ठाकू शकत नाही, स्वामींचा घरचा आहेर | पुढारी

Subramanian Swamy : अरब देशांविरोधात मोदी सरकार उभे ठाकू शकत नाही, स्वामींचा घरचा आहेर

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी नुपूर शर्मा (Nupur Sharma) प्रकरणी पुन्हा एकदा केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. ‘मोदी सरकार (Modi Government) अरब देशांविरोधात (Arab countries) उभे ठाकू शकत नाही’, अशा शब्दांमध्ये बुधवारी स्वामी यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला. भारत सरकारने इस्त्रायल विरोधात आणि दहशतवादी संघटना ‘हमास’ च्या बाजूने मत दिले आहे.

अफगान संकटादरम्यान तालिबानसोबत चर्चेसाठी भारत सरकार कतारमध्ये तातकळत होते. दुबईची ओळख मनी लॉन्ड्रिंग स्वरुपातील आहे. दुबईतूनच बीसीसीआयला नियंत्रित केले जाते. अजून काही ऐकायचे आहे का? असा सवाल ट्विटरवरून स्वामी यांनी उपस्थित केला. सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी यापूर्वी देखील नुपूर शर्मा यांच्यावर भाजपने केलेल्या सहा वर्षांच्या निलंबणाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

मोहम्मद पैंगबर यांच्या विरोधात भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर देशासह अरब देशांमध्ये प्रकरण तापले आहे. अनेक अरब देशांनी भारतीय राजदूतांना बोलावून घेत आक्षेप नोंदवला आहे. ओआयसी, पाकिस्तान व अफगानिस्तान सारख्या कट्टरतेला प्रोत्साहन देणाऱ्या देशांनी देखील या मुद्दयाला तापवत भारताची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला. पंरतु, परराष्ट्र मंत्रालयाने सर्वांना योग्य उत्तर दिले आहे. परंतु, भाजप मधूनच शर्मा यांच्या समर्थनार्थ आवाज उठत असल्याने नेतृत्वासमोर पेच प्रसंग उभा ठाकला आहे.

Back to top button