देशात दर 2 मिनिटाला शंभर बालकांचा जन्म! | पुढारी

देशात दर 2 मिनिटाला शंभर बालकांचा जन्म!

अफाट लोकसंख्या हे कुपोषण, बेरोजगारी, गरिबी यांसारख्या अनेक समस्यांचे मूळ कारण असल्याचे सातत्याने सांगितले जाते, ते शंभर टक्के खरे आहे. युरोपीय देशांचा अपवाद वगळला तर लोकसंख्यावाढीचा विस्फोट जगभर सुरूच आहे. आपला भारत तर लोकसंख्येच्या बाबतीत (140 कोटी) जगात दुसर्‍या क्रमांकावर आहे. केवळ चीन (145 कोटी) या बाबतीत आपल्या पुढे आहे. या पार्श्वभूमीवर, यूएन वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्टस्ने केलेल्या सर्वेक्षणानुसार, प्रजनन दर घटत चालल्याने या शतकाच्या अखेरीस जगाची लोकसंख्या 47 कोटींनी कमी होईल. भारतात लोकसंख्याविषयक सध्याची स्थिती कशी आहे हे जाणून घेणे अगत्याचे आहे.

  •  भारतात दर दोन मिनिटांच्या अंतराने शंभर बालके जन्माला येतात.

  • या शंभरपैकी 34 बालके उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जन्मतात.

  • मध्य प्रदेशात हेच प्रमाण 8 आणि महाराष्ट्रात ते 7 असे आहे.

  • उत्तराखंड, जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात हे प्रमाण एकहून कमी आहे.

स्रोत : वर्ल्डोमीटर डॉट इन्फो (पॉप्युलेशन)

 

Back to top button