

भुवनेश्वर : उडिया चित्रपटांतील अभिनेत्री वर्षा प्रियदर्शिनी आणि अभिनेता खासदार अनुभव मोहंती (बिजू जनता दल) यांचे खासगी प्रकरण स्वत: मोहंती यांनी चव्हाट्यावर आणले आहे. लग्न होऊन 8 वर्षे झाली; पण पत्नी मला हातही लावू देत नाही, अशी तक्रार मोहंती यांनी न्यायालयात दाखल केली. प्रियदर्शिनी यांनीही मोहंतींवर छळाचा आरोप केला आहे. न्यायालयाने मोहंतींच्या याचिकेवर प्रियदर्शिनी यांनी मोहंतींच्या घरातून बाहेर निघावे, असा आदेश दिला तसेच मोहंती यांनी तिला त्या बदल्यात खर्च द्यावा, असे आदेश दिले आहे. सध्या घटस्फोटाचे हे प्रकरण ओडिशा उच्च न्यायालयात सुरू आहे.