भारतीय नौदल, तटरक्षक दलाने १८२ जणांना वाचवले  | पुढारी

भारतीय नौदल, तटरक्षक दलाने १८२ जणांना वाचवले 

मुंबई; पुढारी ऑनलाईन : तोक्ते वादळ आल्यानंतर मुंबईच्या समुद्र किनाऱ्याजवळ असलेल्या ओएनजीसी प्रकल्पावर काम करणाऱ्या लोकांची जीव धोक्यात आला. पण, भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाच्या अथक प्रयत्नानंतर जवळपास १८२ जणांना वाचवण्यात आले. 

ओएनजीसीच्या लांब जहजावरील ६० लोकांना आज ११ वाजेपर्यंत बाहेर काढण्यात आले आहे. राहिलेल्यांना आज रात्रीपर्यंत बाहेर काढण्यात येईल असे भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्याने सांगितले. ओएनजीसीचे बार्ज पी ३०५ हे मोठे जहाज हिरा तेल प्रकल्पावर कार्यरत होते. तोक्ते वादळ आल्यानंतर भरकटले होते. या जहाजावर २६१ लोक होते. हा हिरा तेल प्रकल्प मुंबईपासून ७० किलोमिटर अंतरावर आहे. 

भारतीय नौदलाच्या बचाव मोहिमेचा थरारक व्हिडिओ 

या बचाव कार्यासाठी तटरक्षक दलाची ४ तर नौदलाची २ जहाजे तैनात करण्यात आली होती. याचबरोबर एक व्यापारी जहाजही या बचावकाऱ्यासाठी वापरण्यात आले. या तेल प्रकल्पात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी चार मोठी जहाजे ठेवण्यात आली होती. ज्यावेळी तोक्ते वादळ मुंबईला येऊन थडकले त्यावेळी या चारही जहाजांनी त्यांचा बचाव करण्यासाठी तटरक्षक दलाला संदेश पाठवला होता. याचबरोबर त्यांनी शिपिंग मंत्रालय आणि स्वतःच्या कंपनीच्या नियत्रण कक्षालाही संदेश पाठवला होता. 

तटरक्षक दलाच्या डीआयजी टी आशिष यांनी सांगितले की या चार जहाजांवर जवळपास ८०० लोक असल्याचा अंदाज आहे. नेमका आकडा अजून माहिती नाही. बार्ज पी ३०५ या जहाजावरील आतापर्यंत ६० लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. या जहाजावर अजून २६१ लोक अडकले आहेत. हे जहाज भरकट जात एका  तेल काढणाऱ्या लोखंडी स्ट्रक्चरवर आदळले होते. 

तटरक्षक दलाचे आयजी आनंद बडोला यांनी सांगितले की, ‘पी ३०५ ही प्रोंग्स लाईट हाऊस पासून  ५७ नॉटिकल माईल्सवर आढळून आली. ते जहाज  तेल काढणाऱ्या लोखंडी स्ट्रक्चरवर आदळले. त्यानंतर या जहाजात पाणी भरण्यास सुरुवात झाली. हे जहाज ओएनजीसीच्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी वापरण्यात  येत होते. ज्यावेळी आम्हाला मदतीचा फोन आला त्यावेळी आम्ही काही व्यापारी जहाजांना मदतीसाठी जाण्यास सांगितले. पण, त्यांना ते शक्य झाले नाही. तटरक्षक दल आणि नौदलालाही त्यांचे हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे पाठवता आले नाहीत.’

देशातील १.८ टक्के लोकसंख्या कोरोनाबाधित!

त्यानंतर नैदलाने मंगळवारी सकाळी आपले पी – ८१ हे लांब पल्याचे गस्त घालणारे विमान शोध मोहिमेवर पाठवले. त्यानंतर तटरक्षक दलाचे संकल्प जहाज, नौदलाचे आयएनएस कोची आणि आयएनएस कोलकाता जहाजही पी ३०५ बचाव मोहिमेवर पाठवण्यात आली. 

आएनएस कोलकाताने लाईफ राफ्टमधून दोन लोकांना वाचवले. त्यावेळी नौदलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की समुद्र अत्यंत अशांत आहे. त्यामुळे जहाजाच्या जवळ जाऊन बचावकार्य करणे अत्यंत धोक्याचे आहे. त्यामुळे लाईफ बोटच्या सहाय्यानेच लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. चारही अडकलेल्या जहाजावर रेस्क्सू मिशन सुरु करण्यात आले आहे. पण, समुद्र खवळलेला असल्याने हे खूप आव्हानात्मक आहे. त्यामुळे बचाव मोहिम रात्रभर सुरु राहण्याची शक्यता आहे. 

केंद्राचा उलटा कारभार; खतांच्या दरवाढप्रश्नी पवारांचे पत्र

दुसरे अडचणीत सापडलेले जहाज गाल कन्स्ट्रक्टरवर १३७ जण अडकून पडले आहेत. ते तारापूरपासून ४४ नॉटिकल माईल्सवर आहे. ज्यावेळी त्यांच्याकडून मदतीचा संदेश आला त्यावेळी वॉटर लिली जहाज त्यांच्या मदतीसाठी पाठवण्यात आले. ते त्यांच्यापर्यंत पोहचले असल्याचे सांगण्यात आले आहे. या अडकलेल्या जहाजाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला आहे. मंगळवारी सकाळी तटरक्षक दलाने आपले सम्राट नाव या ठिकाणी मदत कार्यासाठी पाठवली. 

याचबरोबर सपोर्ट स्टेशन ३ ची जहाजही प्रोंग्ज लाईट हाऊस पासून ५८ नॉटिकल माईल्सवर भरकटत गेले आहे. तर चौथे जहाज मोदुसागर भुषण ज्याच्यावर २०२ लोकं असल्याचे सांगण्यात आले आहे. ती लाईट हाऊस पासून ५३ नॉटिकल माईल्सवर आहे. त्याच्याही इंजिनमध्ये बिघाड झाला आहे. या सर्व शोध आणि बचाव कार्यासाठी तटरक्षक दलाच्या शूर, संकल्प, सम्राट आणि समर्थ या नौका पाठवण्यात आल्या आहेत. दरम्यान, ओएनजीसी प्रवक्ते हरिश आवळ यांनी बचाव कार्याबद्दल बोलण्यास नकार दिला. 

Back to top button