दिलासा: लहान मुलांच्या लसीकरणाबाबत सरकारची मोठी घोषणा | पुढारी

दिलासा: लहान मुलांच्या लसीकरणाबाबत सरकारची मोठी घोषणा

नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन 

कोरोनाच्या पहिल्या लाटेत लहान मुलांना संसर्गाचा इतका धोका नव्हता मात्र, दुसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये संसर्ग वाढत आहे. लहान मुलांचे लसीकरण न झाल्याने त्यांना धोका अधिक आहे. याचीच दखल घेऊन केंद्र सरकारने २ ते १८ वयोगटातील दुसऱ्या आणि तिसऱ्या चाचणीला परवानगी दिली आहे. 

वाचा : पद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल यांचे कोरोनाने निधन

कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा जबरदस्त फटका देशाला बसला आहे. यात लहान मुलांनाही मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला असून, कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी धोकादायक ठरेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर लहान मुलांसाठी कोरोनाविरोधातील लसीकरण कधी सुरू होणार?  याबाबत नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी माहिती दिली आहे. 

नीती आयोगाचे सदस्य (वैद्यकीय) डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले, ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने कोव्हॅक्सिन लसीची २ ते १८ वयोगटामधील लहान मुलांवर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी घेण्यास परवानगी दिली आहे. येत्या १० ते १२ दिवसांत ही चाचणी सुरू होणार आहे. 

वाचा : कर्नाटकच्या गृहमंत्र्यानी घरालाच केले कोरोना सेंटर

कोरोनाची दुसरी लाट अद्याप आटोक्यात येत नसल्याचे देशभरात भीतीचे वातावरण आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली असून त्यात लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याची शक्यता वर्तवली आहे. सध्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांच्या संसर्गाची आकडेवारी चिंताजनक असून कर्नाटकात १९ हजारहून अधिक लहान मुलांना कोरोना झाला असून दिल्लीत दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशभरात चिंता वाढली आहे. कोरोनाची एरवी दिसणारी लक्षणे न दिसता त्वचारोग किंवा व्रण अशी लक्षणेही दिसत आहेत. 

वाचा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २६९ डॉक्टरांचा बळी!

Back to top button