भारतीय नौदलाच्या बचाव मोहिमेचा थरारक व्हिडिओ  | पुढारी

भारतीय नौदलाच्या बचाव मोहिमेचा थरारक व्हिडिओ 

मुंबई; पुढारी ऑनलाईन : तोक्ते वादळामुळे महाराष्ट्र आणि गुजरातच्या पश्चिम समुद्र किनाऱ्यावरील अनेक शहरांचे आणि गावांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वारे आणि बरसणाऱ्या सरींमुळे अरबी समुद्रातील मुंबई लगत असलेली काही जहाजे भरकटली होती. त्यामुळे भारतीय नौदलाने मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य हाती घेतले. याच बचावकार्याची काही छायाचित्र आणि व्हिडिओ सध्या भारतीय नौदलाने प्रसिद्ध केली आहेत. 

आपल्या स्पोक्सपर्सन नेव्ही या ट्विट हँडलवरून त्यांनी बचाव कार्याचे व्हिडिओ आणि फोटो शेअर केले. या ट्विटमध्ये नौदलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की ‘आयएनएस कोलकाताने व्हेसलमधील दोन कर्मचाऱ्यांची लाईव्ह राफ्टमधून सुटका करेली आहे. त्यानंतर आयएनएस कोलकाता आयएनएस कोचीबरोबर बर्ज पी ३०५ च्या कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी गेली आहे.’ 

बर्ज पी ३०५ या जहाजावर २७३ कर्मचारी होते. हे जहाज सोमावारी वादळानंतर मुंबई किनाऱ्यावरून भरकटले. याचबरोबर गाल कन्स्ट्रक्टर हे जहाजही १३७ कर्मचाऱ्यांसह भरकटले. आतापर्यंत पी ३०५ बचाव मोहिमेअंतर्गत १७७ लोकांना वाचवण्यात यश आले आहे. 

Back to top button