गंगेत वाहून आलेले मृतदेह टायरने जाळले | पुढारी

गंगेत वाहून आलेले मृतदेह टायरने जाळले

लखनौ : वृत्तसंस्था; उत्तर प्रदेशातील बलिया येथे गंगेत वाहून आलेले मृतदेह टायर व पेट्रोलने जाळण्याचा संवेदनाशून्य प्रकार उघडकीला आला आहे. अशा दहनाचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने व्हिडीओत दिसत असलेल्या पाचही पोलिसांना तडकाफडकी निलंबित केले आहे.

अधिक वाचा : लॉकडाऊन मुदतवाढ, पॅकेज घोषणा आज

उत्तर प्रदेश, बिहारमध्ये गंगेच्या पात्रात शेकडो मृतदेह प्रवाहित केले जात असल्याचे उघडकीला आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. केंद्राने याची गंभीर दखल घेतली. नंतर दोन्ही राज्यांच्या पोलिसांनी काठावर गावे असलेल्या भागांमध्ये नावांतून पेट्रोलिंग सुरू केले. आता आढळलेल्या मृतदेहांवर अंत्यसंस्काराचा विषय वादाचा होतो आहे.

अधिक वाचा : ‘बॉम्ब ब्लास्ट’ने कोयनाकाठ हादरला !

गंगेत प्रवाहित करण्यात आलेले मृतदेह हे हिंदूंचे असताना त्यांचा दाहसंस्कार करण्याऐवजी दफनविधी केले जात आहेत. बहुतांश दफनविधी हे प्रशासनाच्या सांगण्यावरूनच झालेले आहेत. त्यावरही टीका होऊ लागल्यानंतर घ्या करतो एकदाचा दाहसंस्कार, या वृत्तीतून बलिया येथे लाकडांऐजवी टायर व पेट्रोल हे इंधन वापरून मृतदेह जाळण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.  

अधिक वाचा : ‘आयपीएल’मध्ये वाढणार दोन संघ 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नदीच्या काठावर मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास मनाई केली आहे. नदी त्यामुळे प्रदूषित होईल. सूचना देऊनही पोलिस नदीच्या काठावरच मृतदेह पेटवून देत आहेत किंवा गाडत आहेत. पोलिसांवरील निलंबन कारवाईसह इथून पुढे मृतदेह गंगेत प्रवाहित होणार नाही, असे पहावे व त्याउपर मृतदेह आढळल्यास त्यावर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करावे असे आदेश जारी करण्यात आले आहेत.

 

Back to top button