Video : शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्‍यावर शाईफेक, पत्रकार परिषदेत समर्थक-विराेधकांमध्‍ये खुर्ची फेकाफेकी

Video : शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्‍यावर शाईफेक, पत्रकार परिषदेत समर्थक-विराेधकांमध्‍ये खुर्ची फेकाफेकी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्‍या आज शाईफेक करण्‍यात आली. ही घटना कर्नाटकची राजधानी बंगळूर येथे पत्रकार परिषद सुरु असताना घडली. यावेळी कर्नाटकमधील शेतकरी नेते चंद्रशेखर आणि टिकैत समर्थकांमध्‍ये धक्‍काबुक्‍कीसह खुर्ची फेकाफेकीही झाली. याप्रकरणी तिघांना अटक करण्‍यात आली आहे.

स्‍थानिक शेतकरी नेते चंद्रशेखर यांच्‍या समर्थकांवर आरोप

बंगळूर येथे आज राकेश टिकैत यांच्‍या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी स्‍थानिक शेतकरी नेते चंद्रशेखर यांच्‍याबाबत टिकैत यांना प्रश्‍न विचारण्‍यात आला. यावर उत्तर देताना टिकैत यांनी चंद्रशेखर यांच्‍याबरोबर कोणताही संबंध नाही, असे उत्तर दिले. या पत्रकार परिषदेत चंद्रशेखर यांचे समर्थक होते. त्‍यांनी टिकैत यांच्‍यावर शाईफेक केली.
स्‍थानिक पोलिसांनी मला सुरक्षा पुरवली नाही. या हल्‍ल्‍यामागे राज्‍य सरकारचा हात आहे, असा आरोपही टिकैत यांनी यावेळी केला.

राकेश टिकैत यांच्‍यावर शेतकरी नेते चंद्रशेखर यांनी शाईफेक केली. यानंतर टिकैत समर्थकांनी शाईफेक करणार्‍याला पकडले. यानंतर पत्रकार परिषदेमध्‍येच टिकैत आणि चंद्रशेखर समर्थकांमध्‍ये खुर्ची फेकाफेकी झाली. यामुळे येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news