Crime News: प्रेमप्रस्ताव नाकारल्याचा राग: २१ वर्षीय तरुणीचा भररस्त्यात गळा चिरला

प्रेमप्रस्ताव नाकारल्याच्या रागातून २१ वर्षीय तरुणीचा भररस्त्यात गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना घडली.
crime news
crime newsPudhari
Published on
Updated on

Telangana Crime News

हैदराबाद: प्रेमप्रस्ताव नाकारल्याच्या रागातून २१ वर्षीय तरुणीचा भररस्त्यात गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना शनिवारी महबूबनगरमधील जडचेरला शहरात घडली. गेल्या काही दिवसांपासून संशयीत आरोपी मृत तरुणीचा पाठलाग करत होता.

crime news
shocking crime news | प्रेमविवाहाचा करुण अंत! पत्नीने पोलिसात तक्रार केल्याच्या रागातून पतीने भरचौकात संपवले

वाय. वैष्णवी असे मृत तरुणीचे नाव असून, ती जडचेरला येथील एका खासगी शाळेत रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. संशयीत आरोपी गेल्या काही दिवसांपासून प्रेमाच्या नावाखाली तिचा पाठलाग करून तिला त्रास देत होता, असे पोलिसांनी सांगितले.

शनिवारी नेहमीप्रमाणे वैष्णवी बसमधून उतरून पायी चालत जात असताना, आरोपीने तिच्यावर हल्ला केला. भररस्त्यात तिच्यावर चाकूने सपासप वार करत तिचा गळा चिरला. या जीवघेण्या हल्ल्यात वैष्णवी रक्ताच्या थारोळ्यात पडली. हा थरार पाहून स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तिला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, प्रचंड रक्तस्राव झाल्यामुळे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

crime news
Nagpur Crime : इन्स्टाग्रामवरील मैत्री अन् 'प्रेम त्रिकोण'; नागपुरात १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news