BMW X6 : आई गेल्‍याच्‍या नैराश्‍यातून त्‍याने तब्‍बल सव्‍वा काेटींची कार नदीत ढकलली… | पुढारी

BMW X6 : आई गेल्‍याच्‍या नैराश्‍यातून त्‍याने तब्‍बल सव्‍वा काेटींची कार नदीत ढकलली...

पुढारी ऑनलाईन डेस्क :  आई आणि मुलांचं नातं अतूट आणि सर्वात घनिष्‍ठ. सर्वांच्‍याच आयुष्‍यात आई ही सर्वस्‍वच असते. तिचा आकस्‍मिक जाणं हे अनेकांच्‍या मनावर कायमचा घाव घालून जाते. असेच काही कर्नाटक राज्‍यातील श्रीरंगपट्टणमधील तरुणाबराेबरही झालं. आईचा आकस्‍मिक मृत्‍यू झाला आणि ताे नैराश्‍यात गेला. या घटनेने त्‍याच्‍यावर एवढा माेठा आघात झाला की त्‍याने  बीएमडब्ल्यू ही महागडी कार कावेरी नदीमध्ये ढकलून दिली. या कारची एक्स-शोरूम (BMW X6 ) किंमत सुमारे १.३ कोटी रुपये इतकी आहे. (Depressed man)

 श्रीरंगपट्टणमध्ये कावेरी नदी पात्रात लाल रंगाची बीएमडब्ल्यू कार स्थानिक लोकांच्‍या निदर्शनास आली. ग्रामस्‍थ, मच्छिमारांमध्‍ये एकच खळबळ उडाली.अपघात झाल्याचा संशय आल्याने त्यांनी तात्काळ ही माहिती पोलिसांना दिली. त्यांनंतर रेस्क्यू पथकाला बोलावून कारमध्‍ये कोणी अडकले आहे का, याचा तपास घेतला.

Karnataka: Depressed Over Mother Death, Bengaluru Man Dumps Rs 1.3 Cr BMW Car In Cauvery River

कार नदीतून बाहेर काढण्यात आली. कार रिकामीच हाेती.  पोलिसांनी तिच्या नंबरवरून तपास घेतला. ही कार बंगळुरूमधील महालक्ष्मी लेआउटमध्ये राहणाऱ्या तरुणाची असल्याची माहिती त्‍यांना मिळाली. त्‍यांनी संबंधिताला चौकशीसाठी बोलावले. मात्र, हा तरुण गोंधळलेला आणि अस्वस्थ हाेता. ताे असंबध बडबड करत हाेता. त्याचे कोणतेही विधान पोलिसांना ग्राह्य धरता येत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी कुटुंबातील सदस्यांशी संपर्क साधला.

यावेळी मिळालेल्या माहीतीनूसार, आईच्या आकस्‍मिक  मृत्यूने तरुणाला नैराश्यात आहे. अतीव दु:खामुळे त्‍याचे मानसिक संतुलन ढासळले. त्‍याने तब्‍बल १ काेटी ३० लाखांची कार नदीत ढकलून दिली. त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा जबाब नोंदविण्यात. आल्यानंतर संबंधित तरुणांना घेवून कुटुंबीय घरी गेले. तरुणाचे नातेवाईक ही बीएमडब्ल्यू कार घेऊन बंगळुरूला परत जातील, असे अहवालात नमूद करण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणी कोणतीही तक्रार नोंदवली नाही, असे अहवालात म्हटले आहे.

हेही वाचा

Back to top button