हनिमुनच्या रात्री पत्नीला कळलं पतीचं ‘ते’ रहस्य; थेट गाठलं पोलीस ठाणंच

हनिमुनच्या रात्री पत्नीला कळलं पतीचं ‘ते’ रहस्य; थेट गाठलं पोलीस ठाणंच

पुढारी ऑनलाईन डेस्क : कधी कुणाच्या आयुष्यात कोणती घटना घडेल याचा नेम नाही. आता या तरुणीचंच बघा ना… लग्नानंतर आपल्या पतीसोबत हनिमुनला गेली. पण, बंद खोलीत पत्नीला पतीचे जे रहस्य कळले, त्याच्याने तिला मोठा धक्का बसला. लग्नापूर्वी ही रहस्यं सांगण्यात आलेली नव्हती, असे पत्नीने पतीवर आणि त्याच्या घरातील सदस्यांवर आरोप केलेले आहे.

खरं तर ही घटना मध्यप्रदेशमधील इंदौर येथील आहे. या नवविवाहित पत्नीचा पती आणि त्याचे कुटुंब मुंबईमध्ये राहते. या तरूणीचे लग्न फेब्रुवारी महिन्यात झालेले होते. लग्नावेळी पतीच्या घरातील लोकांनी हुंडा म्हणून जबरदस्तीने ५ लाख रोख आणि काही तोळे सोने घेतलेले होते. परंतु, लग्नानंतर सासरच्या लोकांनी छळ सुरू केला. पीडित तरुणीला घराबाहेर काढलं.

इतका सगळा प्रकार झाल्यानंतर पीडिता पोलीस ठाण्यास गेली आणि तक्रार देताना पोलिसांना सांगितलं की, लग्नानंतर मुंबईला आपल्या सासरी पोहोचली. एक आठवडा सासरी राहिली. त्यानंतर हे नव दाम्पत्य हनिमुनसाठी गेले. मात्र, हनिमुनसाठी गेल्यानंतर पत्नीला पती नपुंसक असल्याचं कळलं. तेव्हा नवविवाहितेच्या पायाखालची जमीन सरकली. लग्नापूर्वी पतीला अनेक गंभीर आजार आहेत, परंतु सासरच्या लोकांना आम्हाला काहीच सांगितलं नाही. सध्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

पहा व्हिडीओ : १८०० फुट कोकण कडा सर केलेल्या खुशी कंबोजशी गप्पा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news